Skip to content

Gold Rate | इस्रायलच्या युद्धाचा सोनं-चांदीवर परिणाम; ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?


Gold Rate | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण गेलेले आहेत. तसेच या युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळत आहे. याकारणांमुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी अनेक देशांकडून प्रयत्नही सुरु आहे. इस्रायलमधील युद्धाचा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.  युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होते आहे. एकीकडे भारतात दसरा आणि दिवाळी तोंडावर आली असताना सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ दिसत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान कसे आहेत सोन्या-चांदीचे दर?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करत असतात. मात्र इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते. सध्या दररोज सोन्याच्या किमती नवा उच्चांक गाठत आहेत. ऐन सणासुदीतच सोन्याचा बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे.

maharashtra politics| शिंदे गटाच्या बड्या नेत्यालाच मंत्रालयाच्या गेटवर नो एन्ट्री; नेमकं प्रकरण काय?

एमसीएक्सवर सोने तसेच चांदी महाग

Multi Commodity Exchange वर आज सोन्याची किंमत महाग झाली आहे. आज Multi Commodity Exchange वर सोन्याचा भाव 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ दिसून येते आहे. आज चांदीचा भाव 0.26 टक्क्यांनी वाढला असुन 71,800 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहाचला आहे. यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

22 Carat सोन्याची किंमत किती?

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 55 हजार 850 रुपये आणि अहमदाबादमध्ये 55 हजार 750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय बंगळुरू,  हैदराबाद,  कोलकाता आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. रशिया-युक्रेननंतर आता  इस्रायल-हमास युद्धामुळे सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. त्यात इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत बरीच अस्थिरता दिसुन येत आहे. या अस्थिर बाजारात, गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळत असतात, ज्यामुळे लोक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवणे चांगले मानतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो.

OnePlus Open फोल्डेबल फोन भारतात लाँच; सॅमसंगला टक्कर

सोनं लवकरच गाठणार नवा विक्रम 

6 मे रोजी Multi Commodity Exchange मध्ये सोन्याने 61 हजार 845 रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठलेला होता. तर आज MCX वर सोन्याची किंमत 60 हजार 600 च्या जवळ आहे. त्यामुळे सोन्याची किंमत लवकरच बाजारात नवा विक्रम रचू शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!