NCP Nashik | नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात

0
25
NCP Nashik
NCP Nashik

नाशिक :  नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून, ५ आमदार, १ मंत्री आणि अनेक नगरसेवकही आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर हे तिन्ही आमदार आणि मंत्री छगन भुजबळ हे जिल्ह्यातील शेकडो नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात झाले. यापैकीच एक म्हणजे नाशिकच्या सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले. महाले हे दोन वर्षांपूर्वी शरद पवारांना सोडून अजित पवार गटात दाखल झाले होते.

मात्र, आता पुनही त्यांनी स्वगृही परतणे पसंत केले आहे. अजित पवार गटात होणारी अंतर्गत आणि महायुतीतही होणाऱ्या घुसमटीमुळे नाना महाले हे आज आपल्या शेकडो समर्थक, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले असून, गोविंदबागेत आज टयांचाय जाहीर पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे नाशिकमध्ये हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असून, नाशिकमध्ये आता अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. (NCP Nashik)

Nashik News | नाशिकमध्ये दादा गटाला मोठा धक्का; आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

NCP Nashik | पक्षात अंतर्गत फटाके फुटताय..?

अजित पवार हे आपल्या अनेक समर्थक नेत्यांसह सत्ताधारी महायुतीत आले. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक बडे नेतेही सत्तेत सामील झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत जागावाटपातही अजित पवार गटावर दबाव टाकला गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. एवढेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. तर, शिक्षक पदवीधर निवडणुकीतही दिंडोरीचे अजित पवारांचे बडे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात एकच खळबळ उडाली होती.

तर, नाशिक शिक्षक निवडणुकीत अजित पवारांचा उमेदवार पहिल्या तीनमध्येही नव्हता. यामुळे एकूणच पक्षात चांगलेच फटाके फुटत असून, अनेक नेते नाराज असल्याचीही चर्चा होती.नाशिक हा बालेकिल्ला मानला जात असून, नाशिक ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. या पार्श्वभूमीवर आता नाना महालेंसारख्या शहरात ताकद असलेल्या नेत्याने अजित पवारांची साथ सोडल्याने हा अजित पवार गटाला मोठा फटका मानला जात आहे.  (NCP Nashik)

Girish Mahajan | नाशिकमध्ये महाजनांवर मोठी जबाबदारी; नाशिकच्या लढतीत दादा गटाची कोंडी..?

अजित पवार, भुजबळ यांची भाजपकडून ससेहोलपेट 

नाशिकमधील नाना महाले, सिडको विभागाचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकार्‍यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. दुसरा राष्ट्रवादी पक्ष तयार झाला. तेव्हा त्यांच्या मागे लोकं गेले होते. अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भाजपने महायुतीत ससेहोलपेट केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे नेतृत्व आम्ही नाशिक जिल्ह्यात सिद्ध केले. भाजप वापर करतो आणि सोडून देतो, हे लक्षात आल्यानंतर आज हे लोकं मोठ्या संख्येने शरद पवारांच्या पक्षात येत असल्याचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी सांगितले. (NCP Nashik)

‘हे’ नेते शरद पवार गटात 

माजी नगरसेवक तथा सिडको विभागाचे अध्यक्ष नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा. दरम्यान, नाशिक शहरातील अजित पवार गटात गेलेले शेकडो महत्त्वाचे पदाधिकारी गोविंदबाग येथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here