Girish Mahajan : लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर राज्यातील भाजप नेतृत्व खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, एक एक जागेसाठी महायुती जंग जंग पिछाडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यातच नाशिकमध्ये भाजपकडून राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत (Nashik Teachers Constituency Election 2024) प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची भाजपने नियुक्ती केली आहे. येत्या २६ जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात किशोर दराडे (Kishor Darade) हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असले तरीही अजित पवार गटाकडूनही महेंद्र भावसार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीत फुट पडल्याचे दिसत असून, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत रंगली आहे. तर, दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सभांचा धडाका लावला आहे.
Manoj Jarange Patil | पवार साहेबच म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे.? – गिरीश महाजन
भाजप शिंदे गटासोबत; नाशिकमध्ये दादा गट एकटा पडला
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गिरीश महाजन यांची प्रभारीपदी नियुक्ती केली असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांच्या पाठीशीच भाजप उभे राहणार आहे.
त्यामुळे आता नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे रिंगणात असून, नाशिकमध्ये चौरंगी लढत रंगली आहे. त्यातच आता स्वतः मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मैदानात उतरल्याने आता ते काय राजकीय डाव टाकणार..? हे पहावे लागणार आहे.
Girish Mahajan | उमेदवारांपेक्षा मंत्र्यांची मोठी परीक्षा
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यात आशिनडे गट आणि अजित पवार गट आमने सामने असल्याने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात थेट राजकीय सामना रंगणार असून, या दोघांची ताकद येथे पणाला लागली आहे. तर, यातच आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचीही एन्ट्री झाल्यामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या तीन दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात कोण बाजी मारणार..? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम