Igatpuri | घोटी-भंडारदरा रस्ता झाला चकाचक; आ. कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे भाग्य उजळले

0
20
Sinnar
Sinnar

Igatpuri |  नाशिक व नगर जिल्ह्यातील इगतपुरी व अकोले या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या घोटी- भंडारदरा या राज्यमार्ग क्रमांक २३ ची पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा बारी घाट पर्यंत गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली होती. या विषयी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे यांनी वेळोवेळी आवाज उठवत या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी प्रशासनासह, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. याची लोकप्रतिनिधी नात्याने माजी खासदार हेमंत गोडसे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी दखल घेत आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून ९८ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या रस्त्याच्या नूतनीकरणाचे गेल्या जवळपास दीड ते दोन वर्षांपासून काम सुरु आहे. एस.ए.सावंत कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून या राज्यमार्गाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासह कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने हा राज्यमार्ग क्र.२३ पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत चकाचक झाला असून या रस्त्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून रस्त्याच्या सुशोभीकरणाला सध्या वेग आला आहे. या रस्त्यामुळे इगतपुरी, भंडारदरा,कळसूबाई पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. तर स्थानिक शालेय विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी,पर्यटक,प्रवासी वाहनधारकांना होणारा त्रास कायमचा मिटला आहे.

Igatpuri | आ. कोकाटेंच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच नांदूरकीपाड्यात पोहोचला रस्ता

रस्त्याचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून या रस्त्याच्या दूरवस्थेचे दुखणे अखेर या भागातील सामाजीक कार्यकर्ते राम शिंदे, पांडुरंग वारुंगसे यांच्या सततच्या पाठपुराव्याने व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे मिटल्याने पंचक्रोशीतून याचे कौतूक होत आहे. कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याच्या दुतर्फा ५ हजार वेगवेगळ्या वृक्षांच्या रोपांची लागवड देखील करण्यात येणार आहे. सध्या या रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असून या रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक, गतिरोधक वळण, डायव्हरजन याचे कामकाज पूर्ण झाले आहे.

 

घोटी – भंडारदरा या राज्यमार्ग क्र.२३ चे काम शेवटच्या टप्प्यात आहे.सध्या सुशोभीकरण, फलके यांचे काम वेगात सुरु आहे. या मार्गासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसाह्यातून ९८ कोटी रुपये इतक्या निधीतून हे काम अखेरच्या टप्प्यातून पूर्ण होत आहे. – शाखा अभियंता, (सार्वजनिक बांधकाम विभाग)

घोटी – भंडारदरा या खड्डेमय रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने आवाज उठवत होतो. लोकप्रतिनिधीकडे या रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. यासाठी कायम पाठपुरावा चालू होता. अखेर याची दखल आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतली व हा रस्ता प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. उत्तम काँक्रीट रस्त्यावरून प्रवास करतांना समाधान व्यक्त होत आहे.” – राम शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु.)

पिंपळगाव मोर ते वासाळी या रस्त्याची गेल्या सात आठ वर्षांपासून खूप दुर्दशा झालेली होती या जीवघेण्या खड्डेमय रस्त्यावरचा खडतर प्रवास अखेर संपला यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.” – पांडुरंग वारुंगसे, (माजी पंचायत समिती – सभापती)

Igatpuri | अनिता नलगे फौंडेशनच्या वतीने टाकेद येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कॉट, मेट्रेस वाटप


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here