Nashik Politics | नाशकात मिसळ पार्ट्यांचे बेत वाढले; युतीसह आघाडीतही उमेदवारीसाठी चढाओढ

0
37
#image_title

Nashik Politics | सध्या राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची धुमाळी असतानाच नाशिक शहरासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांचे व इच्छुकांचे लोकांची मते मिळवून निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून नाशकात नेत्यांनी मिसळ पार्टीचं नवं अस्त्र शोधून काढले आहे. लोकांना एकत्र करण्यासाठी मिसळ पार्टीचं माध्यमशोधत पक्षातील नव्या जुन्या लोकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Nashik Politics | नाशकात जागावाटपावरून महायुती पाठोपाठ मविआत देखील रस्सीखेच

नाशकात मिसळ पार्ट्यांचा जोर वाढला

मागील दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये मिसळ पार्ट्यांचा जोर वाढला असून सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडून काही महिन्यांपूर्वी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता विरोधी पक्षाच्या इच्छुकांकडून देखील मिसळ पार्ट्यांचे आयोजन सुरू करण्यात आले असून आज मध्य नाशिकच्या एका इच्छुक उमेदवाराने मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. यात विशेष म्हणजे विद्यमान आमदारांच्या बालेकिल्ल्यातच मिसळ पार्टी करून शहरातील दिग्गज नेते व व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते. ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

Nashik Politics | नाशकात जागांसाठी मविआत महासंग्राम?; जास्त जागा कोणाला मिळणार?

मविआमध्ये इच्छुकांची संख्या जास्त

तर दुसरीकडे, महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाचे सूत्र अजूनही ठरलेले नसून शहरातील चारही जागा कोण कोणत्या पक्षाला व त्यातही कोणत्या व्यक्तीला दिल्या जातील हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे शहरातील सर्वात हॉट समजले जाणारे मध्य नाशिकची जागा अद्याप फायनल झालेली नाही. त्यातच महायुतीत दोन्हीकडून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडे इच्छुकांची जास्त गर्दी झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीपेक्षा मविआच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षांमधील इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात राज ठाकरेंच्या मनसेने देखील मध्य नाशिकची जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता या भागात जागावाटपावरून महासंग्राम पहायला मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here