Crime News | जळगाव जिल्ह्यातील, भडगाव तालुक्यात, पिंपरखेड गावात 28 वर्षीय महिलेला घरात घुसून मारहाण करीत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व संशयीताला अटक करण्यात आली आहे.
Crime News | नाशिक पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; चोरी करून पळणाऱ्याला ठोकल्या बेड्या
रविवारी दुपारी घडली घटना
याविषयी अधिकची माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 राच्या दरम्यान एका 28 वर्षीय महिलेला घरात एकटी असताना आरोपी गणेश संपत भिल याने घरात घुसत तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केला असता, तिचे तोंड दाबून मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपी गणेश भिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे या प्रकरणातील पुढील तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम