Crime News | नाशिक पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; चोरी करून पळणाऱ्याला ठोकल्या बेड्या

0
93
#image_title

Crime News | चोरी करून पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पकडण्यात नाशिक पोलिसांना यश. पुण्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून भामटा पश्चिम बंगालमध्ये पसार होण्याच्या तयारीत होता, मात्र नाशिक पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने अटक करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime | मृतदेहाजवळ पूजा केल्याच्या अघोरी घटनेने नाशकात खळबळ

पुण्यामध्ये 32 लाख 16 हजार रुपये किमतीचे 480 ग्रॅम वजनाचे अर्धवट तयार केलेले सोने नोकराने चोरी केल्याचा गुन्हा शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमित पाल हा मुंबई येथे असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी मुंबईमध्ये जाऊन संशयिताचा शोध घेतला परंतु संशयित मुंबई येथून रेल्वे मार्गे पश्चिम बंगालमध्ये पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

पश्चिम बंगाल मध्ये पळून जाण्याच्या होता तयारी

त्यानंतर वेळ न दवडता पुणे पोलिसांनी सातपूर पोलीस ठाण्यातील कार्यरत उपनिरीक्षक राकेश न्हाळदे यांना माहिती देत मदत मागितली. न्हाळदे यांनी संशयीताचे वर्णन जाणून घेऊन तात्काळ नाशिकरोड रेल्वे स्थानक गाठले नाशिक रोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अजित शिंदे, हवालदार दत्तात्रय वाजे, जीआरपीएफ पोलीस निरीक्षक सचिन बनकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रेल्वे अवघ्या काही मिनिटांपूर्वीच स्थानकावरून निघाल्याने पोलिसांनी त्वरित रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून रेल्वे थांबवली आणि सिनेस्टाईल पद्धतीने संशयिताचा शोध घेत, अमित राबी पाल आरोपीला बेड्या ठोकल्या.

Nashik Crime | उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मद्य तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

साथीदाराला मुंबई येथून घेतले ताब्यात

या आरोपीच्या मुस्क्या आवळल्यानंतर पुणे फरासखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी, पोलीस हवालदार नितीन तेलंगे, पोलीस नाईक, महेश राठोड, पोलीस कर्मचारी गजानन सोसूने यांनी मुंबईत त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता भाईंदर येथून मुकेश काशिनाथ पंखिरा याला देखील ताब्यात घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here