Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांनी सेवानिवृत्ताकडून 19 लाख उकळले

0
37

Nashik Crime | नाशकात सायबर भामट्यांकडून सेवानिवृत्त व्यक्तीस सुमारे 19 लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत, सायबर भामट्यांनी त्या बँकेच्या एका खातेदारास लिंकद्वारे त्याच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळवून तब्बल 19 लाख रुपये लुबाडले असल्याची घटना घडल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात याबाबत अनोळखी संशयितांसह व्हाट्सअप धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सेवानिवृत्त असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Nashik Crime | नाशकात सराईत गुन्हेगाराकडून पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला

लिंकद्वारे मोबाईलचे एक्सेस मिळवत घातला गंडा

तक्रारदार घरी असताना त्याला 27 आणि 28 सप्टेंबर 2024 ला 983812882 या मोबाईल सायबर भामट्यांकडून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडिट कार्ड व्हीजन मधून बोलत असल्याचे भासवून तुमचे क्रेडिट कार्ड अपडेशन संपायला आले असून तसे न केल्यास दर महा दंड आकारला जाईल असे सांगत, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नवीन क्रेडिट कार्डची प्रोसेस करावी लागेल. असे सांगण्यात आले. तसेच त्यासाठी “मी जे डॉक्युमेंट्स आणि लिंक पाठवेल ती चेक करून घ्या. असे सांगत विश्वास संपादन केला गेला. यानंतर क्रेडिट कार्ड ॲप्लीकेशन करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून 5 लिंक्स मार्फत पीएनबी क्रेडिट कार्ड नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी संशयिताने फिर्यादीच्या मोबाईलचा थेट ॲक्सेस मिळवत हवे तेवढे परस्पर आर्थिक व्यवहार केले याप्रकरणी सुभाष ढवळे पुढील तपास करीत आहेत.

Nashik Crime | नाशकात भररस्त्यात कोयता गँगचा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद

पाच लाख केले परत

सायबर भामट्यांनी ऑनलाइन बँकिंग मार्फत तक्रारदाराच्या पीएनबी बचत खाते क्रमांक 8928000200000012 वरून 23 लाख 65 हजार रुपये व पंजाब नॅशनल बँकेच्या पेन्शन खाते क्रमांक 3762000300122121 या खात्यावरून ८२००० असे एकूण 24 लाख 47 हजार रुपये संशयास्पद बँक खात्यात जमा केले तर तांत्रिक अडचणींमुळे हॅकरने 23 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यात परत पाठवले. या प्रकरणात 19 लाख रुपये उकळून संशयिताने आपला संपर्क क्रमांक बंद केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here