Nashik Crime | सातपूर मधील श्रमिक नगरमध्ये कोयता गॅंगने भररस्त्यात तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला कोयता व हॉकीच्या सहाय्याने मारहाण केली असून ऐन घटस्थापनेच्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळे कोयता गॅंगने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनेने नागरिकांना भयभीत करून सोडले असून सातपूर पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. सदर घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Nashik Crime | सफाई कर्मचाऱ्यांच्या हत्येमध्ये भाजपाचा पदाधिकारी संशयित; पोलिसांकडून शोध सुरू
तरुणाला कोयता, हॉकी स्टिकने मारहाण
गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राधाकृष्ण नगरातील धात्रक चौकामध्ये ऍक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांचा पाठलाग करत येणाऱ्या रिक्षातील आठ जणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक्टिवा वरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. परंतु अतुल खरे या तरुणाला आठही जणांनी सिनेस्टाईल पद्धतीत हॉकी स्टिक आणि स्टंपने मारहाण करत, कोयत्याने डोके, पाठ व पायावर जबरी वार केले. तसेच तरुणाला वाचवायला पुढे येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत दाखवली नाही.
Nashik Crime | आडगाव गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद
खाजगी दवाखान्यात नकार दिल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल
सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात नेले परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम