Nashik Politics | नाशकात जागांसाठी मविआत महासंग्राम?; जास्त जागा कोणाला मिळणार?

0
73
#image_title

Nashik Politics | सध्या राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये संभाव्य जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून नाशिकमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. त्यामुळे आता जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मविआतील घटक पक्षांनी प्रदेश समितीकडे विविध मतदार संघाची मागणी नोंदवली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि गजानन शेलार यांनी यातील 8 जागांवर दावा केला आहे. तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार निवडून आले होते. तर यावेळी पक्षाने भाजपचा आमदार असलेल्या दोन जागांवरही दावा केला आहे. त्यामुळे या पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली आहे.

Nashik Political | नाशकात विधानसभेची धुमाळी; पश्चिम मतदार संघात महायुतीत चुरस

जागावाटपावरून नवा वाद होण्याची शक्यता

तर शिवसेना ठाकरे गटाने येथील काही मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली असून जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात नवा वाद उद्भवण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यामध्ये काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसने इगतपुरी, येवला, नाशिक मध्य, सिन्नर, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, बागलाण आणि चांदवड या मतदारसंघावर दावा केला असून मागील निवडणुकीत काँग्रेसचे हिरामण खोसकर हे एकच आमदार इगतपुरी मतदार संघातून विजयी झाले होते. तर मागच्या वेळी काँग्रेसचा बागलण, चांदवड, नाशिक मध्य मालेगाव बाह्य आणि मालेगाव शहर या मतदारसंघातील उमेदवार पराभूत झाले होते. तेव्हा यंदा काँग्रेसने येवला या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मतदार संघाची अतिरिक्त मागणी केली आहे.

जिल्ह्यामधील 55 इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (येवला), नरहरी शिरवळ (ददिंडोरी), नितीन पवार (कळवण), दिलीप बनकर (निफाड) माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली) हे सहा विद्यमान आमदार असून पंकज भुजबळ (नांदगाव), दीपिका चव्हाण (बागलण) आणि अद्वय हिरे (नाशिक पश्चिम) हे तीन उमेदवार पराभूत झाले होते. सध्या जिल्ह्यामध्ये 55 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले असून या 9 जागांवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडोजी मामा आव्हाड आणि शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तर सर्वाधिक इच्छुक देवळाली विधानसभा मतदारसंघातील आहेत.

Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

2019 सालच्या शिवसेना-भाजप युतीमध्ये जिल्ह्यातील 15 पैकी सहा जागांवर भाजपने उमेदवार दिले होती. यामध्ये डॉ. राहुल आहेर चांदवड मधून, देवयानी फरांदे नाशिक मध्यातून, राहुल ढिकले नाशिक पूर्वेतून, सीमा हिरे नाशिक पश्चिम येथून आणि दिलीप बोरसे बागलाण येथून विजयी झाले होते. तर कळवण मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here