सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वाना नोकरी मिळणे अश्यक्य आहे. त्यामुळे युवकामंध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्किल इंडिया मिशन राबविण्यात येत आहे. बेरोजगार युवकांनी या संधीच्या उपयोग करून स्वालंबी जीवन जगण्यासाठी हि मोहीम अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Deola | वाजगावात चोरट्यांचा सुळसुळाट; अज्ञातांकडून भरवस्तीतील घरे फोडण्याचा प्रयत्न
देवळा महाविद्यालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यपाल डॉ. पी.सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ना. मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
Deola | बी.एच.आर. पतसंस्थेच्या ठेवीदारांचा आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळावे यासाठी केले कार्यक्रमाचे आयोजन
देवळा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राध्यापक डॉ. मालती आहेर, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, वसुंधरा आत्मनिर्भर प्रकल्प व्यवस्थापन समितीचे महेंद्र पाटील, डॉ. हंडोरे, मुख्य प्रशिक्षिक कौशल्य विकास केंद्र इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या शीतल दळवी, उपप्राचार्य डॉ. डी. के. आहेर, उपप्राचार्य डॉ. जे. आर. भदाणे, डॉ. दीपक आहेर, डॉ. डी. एम. सुरवसे यांनी उद्योग जगताच्या गरजा पूर्ण करणे, रोजगार निर्मिती करणे, आंतरराष्ट्रीय उद्योगासाठी युवानिर्मिती करणे, कार्यक्षम युवा निर्मिती करणे, त्यासोबतच विविध प्रकारचे प्रशिक्षणे आयोजित करणे जसे प्लंबर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, नर्सरी, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, सोनार, लोहार, मोबाईल रिपेअरिंग, परिवहन, बँकिंग, पर्यटन इत्यादी प्रशिक्षणे आयोजित करून बेरोजगार युवकांना स्वालंबी बनवणे, आत्मनिर्भर बनवणे, सक्षम बनवणे, कौशल्याधारित युवक तयार करणे व भारताची रोजगार क्षमता वाढवणे, अशा अनेक योजना मा. पंतप्रधानांनी युवकांना रोजगार मिळावा यासाठी स्किल इंडिया मिशन मोहीमची स्थापना केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम