Nashik Politics | ठाकरे गट नाशिकमधून फुंकणार आगामी निवडणुकांचे रणशिंग

0
41
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Nashik Politics | उद्या अयोध्येतील राममंदिराचा उद्घाट सोहळा असून या सोहळ्यासाठी देशभरातील सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आमंत्रण देण्यात आलेले असले तरीही मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे सुर आहेत.

आता या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राममंदिर उद्घाटन सोहळ्यादिनी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. आता शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशनाची सुरूवात नाशिकमधून होत असून राजकीय दृष्ट्या आता नाशिकला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Manoj Jarange | मराठ्यांसमोर सरकार बिथरले..?

Nashik Politics | आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी हे महाअधिवेशन

दरम्यान, २३ जानेवारी रोजी नाशिकच्या सातपूर परिसरातील हॉटेल डेमॉक्रसी या ठिकाणी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार असून बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त ठाकरे गट आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी हे महाअधिवेशन नाशिकमध्ये सुरु करणार आहेत.

या राज्यस्तरीय अधिवेशनात १० ते २ वाजेपर्यंत पक्षाचे प्रमुख वक्ते बोलणार असून त्यानंतर या शिबिराचा समारोप हा उद्धव ठाकरे हे भाषण करत करणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार असून या सभेच्या सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रमदेखील पार पडणार आहे.

Devendra Fadnavis | देवेंद्रजींनी श्रीरामांवर गाणं लिहिलं अन् त्यांच्या पत्नीने ते गायलं

Nashik Politics | नाशिकमध्ये येऊन उद्धव ठाकरे नेमकी काय रणनिती आखणार?

आता नाशिकमध्ये येऊन उद्धव ठाकरे नेमकी काय रणनिती आखणार? तसेच या अधिवेशना दरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडी होणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर उद्घाटनाच्या मुहूर्तावर प्रभू श्री रामाचं विशेष नातं असलेल्या नाशिकमध्ये येत आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेकडून रणशिंग फुंकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या राजकीय दृष्ट्या नाशिकला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here