Skip to content

Manoj Jarange | मराठ्यांसमोर सरकार बिथरले..?

Manoj Jarange

Manoj Jarange |  संपूर्ण देशाचे लक्ष हे उद्याच्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याकडे लागलेल्या आहे. दूरदूरहून लोक अयोध्येकडे निघाले आहेत. आतापासूनच अयोध्येत सर्व हॉटेल्स आणि निवासस्थाने बूक झालेली आहेत. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सर्वांचीच इच्छा आहे.

मात्र टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, ह्या अभूतपूर्व सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अयोध्येला जाणार नसल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री अयोध्येला जाणार नाहीत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत एक सूचक ट्विट करत माहिती दिली आहे.(Manoj Jarange)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी तसं एक सूचक ट्विटही केलेलं आहे.(Manoj Jarange)

Manoj Jarange | एकही मराठा उपाशी जाता कामा नये; ६ लाख भाकरी, ३०० क्विंटल भाजी

Manoj Jarange | एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये काय म्हणाले..?

या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, “अयोध्येत उद्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक व नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. ही देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब असून, या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्यापेक्षा संपूर्ण मंत्रीमंडळ तथा खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतील दर्शनाची तारीख व वेळ ही लवकरच ठरवत आहोत.(Manoj Jarange)

Manoj Jarange | ….अन् मराठ्यांच्या सेनापतीला अश्रु अनावर

अंतरवाली सराटी येथून काल निघालेले मराठा नेते मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत असलेले लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. या आंदोलनात आणि मराठ्यांच्या या पायी दिंडीत राज्यातील सकल मराठा समाजाने सहभागी होण्याचे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.

याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अयोध्येला जाणे रद्द केलेले आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर आता राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबतही सरकार काय निर्णय घेणार? आणि खरंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार की नाही? हे पहावे लागणार आहे.(Manoj Jarange)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!