Devendra Fadnavis | देवेंद्रजींनी श्रीरामांवर गाणं लिहिलं अन् त्यांच्या पत्नीने ते गायलं

0
3
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis |  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायिका आहेत. त्यांचे याआधी ‘मूड बनालेया‘ हे गाणे बहुचर्चित होते. त्या नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर, कधी त्यांच्या वकतव्यांमुळे आता अमृता फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आणि अमृता फडणवीस यांनी गायलेलं गाणं लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे येथे आयोजित ‘वॉक फॉर नेशन’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.(Devendra Fadnavis)

संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता. तो अयोध्येच्या राम मंदिरच्या लोकार्पणाचा उद्याचा ऐतिहासिक दिवस आहे. यासाठी संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांबाबत एक गाणं लिहिलेलं आहे आणि ते मी गायलेलं असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीला येणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, हे गाणं आता लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Devendra fadanvis| मी ब्राह्मण म्हणून सॉफ्ट टार्गेट; देवेंद्र फडणवीस यांचे धक्कादायक खुलासे

Devendra Fadnavis | अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध

प्रभू श्रीरामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं असून, मी देखील हे गाणं गायलं आहे. आज पहिल्यांदाच मी हे जाहीर करत आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं हे गाणं सर्वांच्या भेटीला येणार असल्याचंही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.(Devendra Fadnavis)

अमृता फडणवीसांनी दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा

आज पुणे येथे ‘वॉक फॉर नेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे ‘नमो वॉकथॉन’ आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वॉकथॉनसाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील हे देखील वॉकथॉनसाठी उपस्थित आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

CM Eknath Shinde | विरोधी पक्षांचे अवसान गळाले; मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच घेरले

नमो वॉकॅथॉनबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “स्फूर्ती आणि उत्साहाने या नमो वॉकॅथॉनची आज सुरुवात झाली आहे. चंद्रकांत दादाही पण इथे आहेत. सगळ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्यात.(Devendra Fadnavis)

संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष आता अयोध्या नगरीकडे आहे. उदय अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, “प्रभू श्रीराम हे अयोध्येत विराजमान होणार आहेत. ही अत्यंत सुखाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळेच राम मंदिर झालं. सगळ्या राम भक्तांसाठी हा अत्यंत आनंदाचा सोहळा असल्याचं अमृता फडणवीस म्हटल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here