Skip to content

Spiritual News | देवळा तालुक्यात भक्तिमय वातावरण; मंदिरांवर विद्युत रोषणाई

Spiritual News

Spiritual News |  सोमनाथ जगताप – देवळा : उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत असून त्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील गावागावात मंदिर स्वच्छतेसह मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Manoj Jarange | एकही मराठा उपाशी जाता कामा नये; ६ लाख भाकरी, ३०० क्विंटल भाजी

देवळा तालुक्यातील गावागावात मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने संपुर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार (दि .२२) रोजी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने गावागावांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Spiritual News | गावांतील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू

देवळा शहरासह तालुक्याच्या गावांतील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू असून काही ठिकाणी रंगरंगोटी करून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच भगव्या पताका लावण्याचे काम सुरू झाले असून भक्तिमय वातावरणात भक्तिगीते वाजवली जात आहेत.

Nashik | श्रमदान हेच सर्व श्रेष्ठ दान – ॲड. नितीन ठाकरे
देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथे सकाळी भव्य रांगोळी स्पर्धा, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, रामरक्षा पठण, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद असे भरगच्च नियोजन आहे. रणादेवपाडे आणि इतरही काही गावांमध्ये एकत्रितपणे पुरणपोळीचा नैवेद्य व महाप्रसाद दिला जाणार आहे. यादिवशी तालुक्यातील सर्वच गावांत कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी तसेच देशी व विदेशी दारू विक्री करण्यास बंदी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!