Ram Temple | अखेर ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; ठाकरे अयोध्येत जाणार?

0
2
Ram Temple
Ram Temple

Ram Temple | उद्या अयोध्येतील राममंदिराचा उद्घाट सोहळा असून या सोहळ्यासाठी देशभरातील सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळींना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

Manoj Jarange | मराठ्यांसमोर सरकार बिथरले..?

Ram Temple | देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण आतापर्यंत आलं नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे सुर होते. मात्र आता रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले असून त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. या यादीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.

Ram Temple | प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलं नाही

मात्र शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलेलं नसून ठाकरेंना स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट येत असून अनेक राजकीय नेत्यांना स्वत: भेटून निमंत्रण देण्यात आलं मात्र उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलेलं नसून आता उद्धव ठाकरे हे श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

Nashik Politics | ठाकरे गट नाशिकमधून फुंकणार आगामी निवडणुकांचे रणशिंग

आता या घडामोडीनंतर राज्यात आणखी काय दावे-प्रतिदावे केले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राममंदिर उद्घाटन सोहळ्यादिनी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. आता शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशनाची सुरूवात नाशिकमधून होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here