Ram Mandir | अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ‘या’ कंपन्यांचे शेअर्स तेजीत

0
3
Ram Mandir
Ram Mandir

Ram Mandir |  संपूर्ण देशाचे लक्ष ज्या अभूतपूर्व सोहळ्याकडे लागले आहे. तो प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा आज अवध नगरीत पार पडत आहे. तब्बल ५०० वर्षांपासून अवघा देश ज्या क्षणाची वाट पाहत होता. तो डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण आज अवतरला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मंदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक राज्यांमध्ये सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.(Ram Mandir)

रामलल्ला येणार असल्याने त्याचा परिणाम आता शेअर मार्केटवरही दिसत आहे. कारण, यामुळे काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी सुरू आहे. आजच्या ह्या दिमाखदार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. वाचा सविस्तर माहिती…

इंडियन हॉटेल्स अँड कंपनी लिमिटेड

आजच्या ह्या अयोध्येतील सोहळ्यासाठी देशभरतूनच नाहीतर संपूर्ण जगभरातून लोक अयोध्येत येत आहेत. दरम्यान, येथे येणार्‍या भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी टाटा समूहाच्या इंडियन्स हॉटेल लिमिटेड या कंपनीनेअयोध्येत दोन आलिशान हॉटेल्स बांधण्याची तयारी केली आहे.

टाटाने ही घोषणा केल्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच मागील आठवड्यात शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी इंडियन हॉटेल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली व तो ४.१८ टक्क्यांनी वर गेला असून, ४८३ रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने मागच्या महिन्यात १३ टक्के तर, गेल्या सहा महिन्यांमध्ये २३ टक्के आणि वर्षभरात ६२ टक्के व पाच वर्षांत २६२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. दरम्यान, सध्या ह्या कंपनीच्या शेअरने ४८३ रुपये इतकी पातळी गाठली आहे.(Ram Mandir)

Ayodhya Ram Mandir | श्रीरामाच्या जयघोषात नाशिकहून साधू-महंत अयोध्येकडे रवाना

अपोलो सिंदुरी हॉटेल्स  

अपोलो सिंदुरी हॉटेल्स ही कंपनी अयोध्येत येणाऱ्या लोकांसाठी मल्टी लेव्हल पार्किंग बनवत आहे. मूळ चेन्नईची असलेली ही कंपनी ३,००० चौरस मीटर इतक्या क्षेत्रात पसरलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वर सूचीबद्ध असलेल्या या कंपनीच्या शेअर्समध्येही गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झालेली आहे. तसेच एका महिन्यात ‘अपोलो सिंदूरी हॉटेल्स’चे शेअर्स हे तब्बल ४८ टक्क्यांनी वाढलेले असून, याचवेळी आता मागील सहा महिन्यांत ७४ टक्के आणि एका वर्षाभरात ७८ टक्के तर, मागील पाच वर्षांमध्ये १४० टक्के इतका परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. सध्या कंपनीचे शेअर हे २२८५ रुपयांवर आहेत.(Ram Mandir)

Ram Mandir | लार्सेन अँड टुब्रो 

आजचा सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंजेच उद्या या कंपनीचे शेअर्स मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे. कारण, अयोध्येतील हे राम मंदिर बांधण्याचे काम याच कंपनीकडे आहे. दरम्यान, या कंपनीचे मार्केट कॅप ४.९९ लाख कोटी रुपये असे आहे. ही कंपनी राम मंदिर बांधत असून, टाटा समुहाचीच एक कंपनी, टाटा कन्सल्टन्सी इंजिनिअर्स हीदेखील L&T या कंपनीला मदत करत आहे. तर, या कंपनीच्या शेअर्सच्या दरामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. तसेच शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर १.१५ टक्क्यांनी वाढला आणि ३६२७.४० रुपयांवर येऊन बंद झाला होता. मागील सहा महिन्यांतच ४७ टक्के व एका वर्षभरात ६३ टक्के इतका परतावा या शेअर्स ने दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्समधून तब्बल १८३ टक्के इतका परतावा मिळाला आहे.

Ram Mandir | मुख्यमंत्र्यांचे राज्यातील मंदिरांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

प्रवेग लिमिटेड

पर्यटनाच्या ठिकाणी आलिशान तंबू बनवण्याचे काम प्रवेग लिमिटेड ही कंपनी करते. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या आधीच या कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलेला आहे. मागील एका महिन्यातच कंपनीच्या समभागांनी ६३ टक्के इतका मोठा परतावा दिलेला आहे. या कंपनीची गेल्या सहा महिन्यांची कामगिरी पाहता, कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये तब्बल १२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२४४० कोटी इतक्या रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या प्रवेग लिमिटेडने मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये अयोध्येत एक आलिशान रिसॉर्ट उघडलेले होते. दरम्यान, प्रवेग लिमिटेड ही कंपनी ‘लक्झरी टेंट सिटी’ विकसित करते. अयोध्येतदेखील ही कंपनी रामजन्मभूमीच्याच जवळपास लवकरच एक टेंट सिटी विकसित करणार आहे. तसेच ही कंपनी लक्षद्वीप येथे पर्यटन शहर विकसित करण्याचाही विचार करत आहे. तर, कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात तब्बल २०० टक्के इतकी वाढ झालेली आहे. तर, मागील पाच वर्षात ४४,००० टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढ होऊ शकते. (Ram Mandir)

आयआरसीटीसी लिमिटेड

आयआरसीटीसी लिमिटेड या रेल्वेशी संबंधित कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलेला आहे. गेल्या आठवड्यात शनिवार रोजी १०.७० टक्क्यांच्या तेजीसह १०२६.४० रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर आहे. ‘आयआरसीटीसी लिमिटेड’ ही कंपनी धार्मिक तसेच अन्य पर्यटन स्थळांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा पुरवते.

तसेच सध्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’ चालवण्याचीदेखील जबाबदारी याच कंपनीकडे आहे. लोकार्पण सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यापासून अयोध्येकडे जाणाऱ्या भाविकांचा ओढा हा वाढला असून, आगामी काही दिवसांत तो अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्या दृष्टीने अधिक आणि विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. गेल्या महिन्याभरात आयआरसीटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने १९ टक्के इतका परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यात ६५ टक्के तर, पाच वर्षात ५५८ टक्के इतका परतावा दिला आहे. (Ram Mandir)

(टीप- वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here