Nashik Political | नाशकात विधानसभेची धुमाळी; पश्चिम मतदार संघात महायुतीत चुरस

0
9
#image_title

Nashik Political | सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमाळी असून सर्वच पक्षातील आमदार उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक नेत्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर झणझणीत मिसळ पार्टी ठेवली. ज्याला हजारो राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ज्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगवताना दिसतेय.

सध्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना जोर आला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर हे इच्छुक उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे मागील दोन टर्म येथून निवडून आल्या आहेत. तेव्हा या परिस्थितीमध्ये महायुती मधून ही जागा कोणाला मिळणार यावरून घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली असून एकमेकांना आव्हान देण्याची तयारी देखील सुरू आहे.

Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात

मिसळ पार्टी की प्रचार मोहीम?

यातच आता शिंदे गटाचे नेते व इच्छुक उमेदवार माजी आमदार बळीराम उर्फ मामा ठाकरे यांनी मतदारसंघात प्रचार मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी नुकतीच मिसळ पार्टी आयोजित केली. ज्या पार्टीला 4000 हून अधिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या इतक्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने मंगल कार्यालयाची जागा देखील कमी पडली. त्यामुळे सध्या ही मिसळ पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे .

या नेत्यांनी लावली मिसळ पार्टीला हजेरी

या मिसळ पार्टीला माजी महापौर प्रकाश मते, शेकापचे माजी उपमहापौर मनीष बस्ते, काँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, सतीश सोनवणे, कैलास अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे, भाजपा नेते शशिकांत जाधव अशा अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.

Nashik | इंदिरानगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी संपवले जिवन; कारण अद्याप अस्पष्ट

मिसळ पार्टीला सीमा हिरे देखील उपस्थित

एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीची चर्चा आणि त्यासाठी तयारी करीत असलेल्या मामा ठाकरे यांचे सर्व नेत्यांकडून कौतुकही करण्यात आले. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. पण आश्चर्य म्हणजे या मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या विद्यमान आमदार आणि आगामी निवडणुकीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या सीमा हिरे या थेट व्यासपीठावर उपस्थित होत्या ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी देखील ठाकरेंना शुभेच्छा देत, महायुती नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पक्षाकडे असतानाही शिंदे गटा मार्फत त्यावर दावा केला जात असलेल्या मिसळ पार्टीला उपस्थित राहत भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरेंनी आपले पती महेश हिरेंसोबत खमंग आणि झणझणीत मिसळीचा रस्सा चाखला. तेव्हा आता आगामी विधानसभा निवडणुकीत झणझणीत मिसळीचा ठसका कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here