Nashik News | निवडणूक विभागात कर्मचारी नेमणुकीत गोंधळ; शिपाई कर्मचाऱ्याची केंद्राध्यक्ष पदी नेमणूक

0
47
#image_title

Nashik News | बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता मतदान केंद्र अधिकारी नियुक्ती करताना गोंधळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार्यालयीन शिपायास थेट मतदान केंद्राध्यक्ष करून त्यांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने या कर्मचाऱ्यांना काम करताना अवघडल्यासारखे झाले आहे.

Nashik News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; 45 सराईत तडीपार

जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष पद सोपवले

जिल्ह्यामध्ये एकूण 15 मतदारसंघात 4,919 मतदान केंद्रे आहेत. तेथील मतदानाची जबाबदारी सांभाळण्याकरिता 35 हजार 79 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यातील 25 हजार 572 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचे काम सांभाळावे लागणार असून त्यांच्यावर खरी जबाबदारी असते. पण केंद्राध्यक्ष ठरवताना निवडणूक शाखेने आस्थापितांकडून मागविलेल्या माहितीच्या आधारे नियुक्ती दिली आहे. ज्यात जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभवी कर्मचारी या संदर्भाने केंद्राध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र यामध्ये काही शिपायांना नियुक्त केल्याचे आता उघडकीस आले आहे.

या गोंधळात त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये काही अधिकारी नियुक्त झाल्याने त्यांना कामे कशी सांगायची अशी अडचण या कर्मचाऱ्यांची झाली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये 5 हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी व 4,194 विशेष कर्मचारी आहेत. शिवाय महिला व दिव्यांगांची नियुक्ती असलेल्या प्रत्येक मतदारसंघात दोन केंद्रे आहेत. महिला व दिव्यांगांच्या केंद्रातील कार्यकरिता इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रावरून गोंधळ उडाला आहे.

पद किंवा हुद्द्याचा उल्लेख नसल्यामुळे गोंधळ

डाटा एन्ट्री करताना अधिकाऱ्यांचे पद किंवा हुद्द्याचा उल्लेख नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच पंक्तीत बसविले आहेत. त्यामुळे कार्यालयातील शिपायाला मतदान केंद्राध्यक्ष करण्यात आले असून अधिकाऱ्याला मतदान कर्मचारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच यापूर्वी कधीही निवडणुकीचे काम न करणाऱ्यांना देखील मतदानाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याच्या तक्रारी केल्या जात आहे.

Nashik News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; 45 सराईत तडीपार

“निवडणूक विभागात कर्मचारी नियुक्त करताना संबंधित आस्थापनेकडून विहित नमुन्यात कर्मचारी अधिकाऱ्यांची माहिती पे स्लिप्स मागवली होती. सरमिसळ करुन ही माहिती एकत्रित करून त्यानुसार कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात काही ठिकाणी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यात येईल”

– डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here