Advay Hire | ‘अद्वय हिऱ्या तुझं कधीच बरं होणार नाही’; भर सभेत नागरिकाने अद्वय हिरेंचा मुखवटा फाडला

0
104
#image_title

Advay Hire | महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांचा गाव भेट प्रचार दौरा ग्रामीण भागात सुरू आहे. काल अजंग गावी भुसे यांनी भेट दिली असता तेथील सभेत एका सामान्य मतदाराने विरोधी उमेदवाराकडून झालेल्या फसवणुकीची आपबिती सांगत अद्वय हिरेंचा बुरखा फाडला.

Malegaon Vidhansabha | अद्वय हिरे पुन्हा बरळले; मुख्यमंत्री अन् मंत्री भुसेंचा बाप काढत खालच्या पातळीवर टिका

नेमके प्रकरण काय? 

हिरेंकडून फसवणूक झालेल्या दत्तू गंजे नामक मतदाराने भर सभेत अद्वय हिरे यांनी गोरगरिबांना कसे फसवले याचा पाढा वाचला. मुलाला नोकरीला लाऊन देतो असे आमिष दाखवत पावणे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे यावेळी दत्तू गंजे यांनी सांगितले. “२० वर्ष यांच्या चपला उचलून आमच्या चपला तुटल्या. पण याने माझ्या पोराला नोकरीला लावलं नाही. त्याच्यामुळे माझी दोन्ही मुलं वेगळी झाली. माझं कुटूंब फुटलं. मी त्याच्या तोंडावर सांगतो अद्वय हिऱ्या तुझं कधीच बरं होणार नाही”, अशी संतप्त भावना या नागरिकाने सर्वांसमोर बोलून दाखवली.

Advay Hiray | बँक फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंच्या कोठडीत आणखी वाढ

हिरेंची कारकीर्द वादग्रस्त

अशा अनेक घटना मालेगावमध्ये यापूर्वीही समोर आल्या आहेत. हिरेंच्या शिक्षण संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक करून त्यांच्याकडून हिरे कुटुंबीयांनी पैसे आकरल्याचा प्रकार यापूर्वीही समोर आला होता. त्यानंतर नाशिक मर्चंट बँकेतील अद्वय हिरेंचा आर्थिक अपव्यवहार ज्यामुळे त्यांना 9 महिने तुरुंगात रहावे लागले. अशा हिरेंच्या एक ना अनेक घटना या जनतेसमोर आल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here