Nashik News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; 45 सराईत तडीपार

0
74
#image_title

Nashik News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहर व जिल्ह्यात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील 45 सराईत गुन्हेगारांवर तडीपाडीची कारवाई केली असून पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Nashik News | मालेगावात स्थिर नियंत्रण पथकाच्या कारवाईत 14 लाखांची रोकड जप्त

45 सराईत जिल्ह्यातून तडीपार

नाशिक जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यावर उपअधीक्षक तसेच अपर अधीक्षकांनी चौकशी केल्यानंतर मागच्या 10 महिन्यांमध्ये 77 गुन्हेगारांवर तडीपारचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी आता 45 सराईत गुन्हेगारांना 6 महिने ते 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले गेले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील आचारसंहितेदरम्यान 7 सराईतांना तडीपार करण्यात आले असून लोकसभा निवडणुकीदरम्यान, जिल्ह्यातील एकूण 24 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी सायखेडा व आयशानगर हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोघा सराईतांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध केले असून या दोघांना नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Nashik News | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा उद्या महाराष्ट्रात; नाशकात जाहीर सभेचे आयोजन

अवैध धंद्यांविरोधात कारवाई

दरम्यान, पोलीस अधीक्षक देशमाने यांच्या आदेशावरून जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला असून पोलीस ठाण्यांतर्गत अवैध मद्य, गावठी दारू, गांजा, अमली पदार्थ, गुटख्या विरोधात कारवाई अंतर्गत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच धारदार हत्यारे, गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे. ही मोहीम दिवसेंदिवस अधिक तीव्र केली जाणार असून या कारवाईत पोलीस ठाण्यांच्या पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील सहभागी आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here