Nashik News | चांदवड येथील दिघवद गावच्या शिवारातील गांगुर्डे वस्तीवर विहिरीत पडलेल्या चिमुकल्याला वाचवायला गेले असता आईचाही विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मायलेकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik News | नाशिक-मुंबई लोकलची मागणी पूर्ण होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले स्पष्ट
सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान घडली घटना
गांगुर्डे वस्ती येथील शिवांश दौलत गांगुर्डे हा दोन वर्षाच्या मुलगा सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान खेळत असताना विहिरीत पडला होता. त्यावेळेस त्याला वाचाविण्याकरिता आई पूजा हिने धाव घेतली. त्यांनी आपल्या जिवाचा आटापिटा करत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या हाताने अदु असल्याने त्यादेखील तोल जाऊन विहिरीत पडल्या. घटना समजतात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याकारणाने पूजा व शिवांश यांचा शोध घेणे अवघड झाले होते.
तीन-चार तासांचा प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश
त्यानंतर, तीन ते चार तासानंतर पूजा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नंतर विहिरीतील पाणी उपसण्यात आले, त्यानंतर देखील सकाळपर्यंत शिवायचा मृतदेह हाती लागला नव्हता. पोलीस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक भानुदास नन्हे हे घटनास्थळी हजर होते. पूजा यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम