Nashik News | अनेक वर्षांपासून होत असलेली नाशिक-मुंबई लोकलची मागणी आता ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ने पूर्ण होणार आहे. रेल्वे बोर्डाने या नवीन स्वदेशी बनावटीच्या रेल्वेला मंजुरी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. आज भाजप पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत लोकल रेल्वेची मागणी केली असता त्याला पर्याय म्हणून ‘नमो भरत रॅपिड रेल्वे’ सुरू केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक अडचणीमुळे येत होते अडथळे
नाशिक-कसारा लोकलच्या मार्गात कसारा घाटाची चढण, बोगदा, डब्यांचा आकार, आवश्यक असलेली गती, लोकलच्या इंजिनचे डिझाईन अशा तांत्रिक बाबींमुळे अडथळे येत होते. परंतु भारतीय रेल्वेन नुकतीच स्वदेशी बनावटीतून ‘आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत’ ‘वंदे भारत एक्सप्रेस’ तयार केली. ज्यामुळे नाशिक-मुंबई लोकलला पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आता उंचावली आहे. त्याचाच आधार घेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेत, मुंबई-नाशिक, कल्याण-नाशिक या मार्गावर ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ मंजूर करावी अशी मागणी केली. तसेच ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ 150 किलोमीटर अंतरावर चालवण्याची मंजुरी असून हायस्पीड रेल्वे असल्याने आणि डब्यांचा आकार वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे असल्याने नाशिक-मुंबई लोकल गावाच्या तांत्रिक बाबींची होणार असल्याची बाब रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यावर सकारात्मकता दाखवत रेल्वेमंत्र्यांनी लवकरच चाचणी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई व उपनगरांमध्ये वेळेत पोहोचणे शक्य होणार
त्याचबरोबर, ज्या रेल्वे मार्गावर तांत्रिक बाबी उद्धवत आहेत त्याच मार्गांसाठी ‘नमो भारत रॅपिड रेल्वेची’ निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ही रेल्वे सुरू झाल्यास नाशिककरांना कल्याण, ठाणे, मुंबई व इतर उपनगरांत जाण्यासाठी कमी कालावधी लागेल. तसेच ही रेल्वे जलद आणि सुखकर असल्याकारणाने नाशिक-मुंबई अंतर आटोक्यात येणार आहे. या चर्चेवेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाना शिलेदार ॲड. शाम बडोदे, बापू पिंगळे, सुनील केदार आदी उपस्थित होते.
शेतीमालाच्या वाहतूकीस लाभ
ही रेल्वे सुरू झाल्यास शेतमालाची वाहतूक व साठवणूक करणे सोयीचे होणार असून यासाठी रेल्वेकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी सांगितले. तसेच कांदा, द्राक्ष, भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट ग्राहक मिळावा यासाठी पार्ट लोड बुकिंगची व्यवस्था सुद्धा करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम