NIA/ATS Raid | एनआयए (NIA) आणि एटीएसने (ATS) महाराष्ट्रात संयुक्त कारवाई करत तीन जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा देखील समावेश असून याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nashik News | नाशिक-मुंबई लोकलची मागणी पूर्ण होणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले स्पष्ट
देशभरात कारवाईचे सत्र सुरू
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएकडून देश विघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभरात कारवाई सुरू असून आत्तापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातही पहाटेपासून तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी आणि कारवाई केली आहे. यामध्ये जालना शहरातील रामनगर चमडा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयताची एनयेकडून चौकशी करण्यात आली असून आज सकाळी चार वाजेपासून चौकशी सुरू होती. तर एटीएसकडून चौकशी सुरू असलेला तरुणा चामड्याचा व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.
नाशिकच्या मालेगावातही छापेमारी
त्याचबरोबर, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात पवारवाडी रोडवरील, अब्दुल्लानगर मधील एका डॉक्टरच्या होमिओपॅथी क्लिनिकवर एनआयएकडून छापा मारण्यात आला असून या ठिकाणी रात्रीपासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर मालेगावात इतरही काही ठिकाणी केंद्रीय संस्थांनी छापा टाकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कारवाईत जम्मू-काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना यावेळी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम