Nashik News | नाशिक महापालिकेतील कायम अधिकारी, कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी 20000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सानुग्रह अनुदानाच्या रकमेत 3 हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली असून मानधनावरील कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दहा कोटींचा बोजा पडणार आहे.
अनुग्रह अनुदानाची आयुक्तांकडे मागणी
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसह महापालिकेच्या कर्मचारी संघटनेकडून दिवाळीच्या निमित्ताने महापालिकेतील स्थायी पदावरील सर्व अधिकारी कर्मचारी, फिक्स पे वरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानवत वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका आणि मदतनीस, अंशकालीन शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी, एन.यु.एच.एम व एन.यु.एल.एम कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी यांना वाढत्या महागाईनुसार 25000 रुपये सहानुग्रह अनुदान देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
तर यांना दहा हजार रुपये अनुदान
महापालिकेतील 5500 कायम, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असून शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण सोसायटी बूस्टर पंपिंग स्टेशन समग्र शिक्षा अभियान एन.यु.एच.एम, एन.यु.एल.एम आशा कर्मचारी युनिसेफ अशा सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
Nashik News | इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून युवकाचा मृत्यू
या अधिकाऱ्यांना लाभ नाही
सातव्या वेतन आयोगाच्या लेबल एस 17 व त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रह अनुदान दिले जाणार असून त्यामुळे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, अतिरीक्त आयुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्याधिकारी, मुख्या लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, सर्व कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त यांना सहानुग्रह अनुदानातून वगळण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम