Nashik News | नाशिकमधील शाळेत शिक्षकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

0
73
Nashik News 
Nashik News 

Nashik News |  नाशिकचे ड्रग्स प्रकरण, त्यानंतर दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरण आणि क्षुल्लक कारणांवरून दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या हत्येच्या घटना, समोर येत असलेली लाचखोरीची प्रकरणं यामुळे नाशिक हे आता धार्मिक नाहीतर, गुन्ह्यांचे शहर म्हणून नावारूपाला येऊ लागले आहे. दरम्यान, आता अशातच आणखी एक धक्कादायक प्रकरण नाशिकमधून समोर आले आहे.(Nashik News)

यानुसार, नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी ‘एकलव्य’ निवासी शाळेमध्ये काही विद्यार्थींनींसोबत अश्लील प्रकार होत असल्याचा प्रकार समोर अला आहे. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थींनींसोबत हे कृत्य करणारा नराधम हा त्यांचाच शिक्षक आहे. दरम्यान, विद्यार्थींनींनी केलेल्या या तक्रारीनंतर शाळेतील विशाखा समितीने चौकशी केली. त्यात १ पुरुष शिक्षक तर दोन महिला शिक्षकांचा सहभाग असून, ते या प्रकरणातील दोषी असल्याचे उघड झाले. या आरोपी शिक्षकांवर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Nashik News)

Nashik | नाशिकमध्ये पुन्हा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट

नाशिक मधील एकलव्य आदिवासी शाळेत तब्बल १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच त्यांचा विनयभंग केला आहे. त्यानुसार, या दोषी शिक्षकावर आदिवासी विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. या शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. तसेच, या प्रकरणी आता संबंधित शाळेच्या प्राचार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच मुख्य आरोपीसह २ महिला शिक्षकांचेही निलंबन करण्यात आले आहे.(Nashik News)

Nashik News | शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील स्पर्श… 

नाशिकमधील एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थिनींसोबत अश्लिल कृत्य होत असल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. आरोपी शिक्षक हा संबंधित विद्यार्थिनींना शिकवण्याच्या किंवा इतर बहाण्याने चुकीच्या आणि अश्लील पद्धतीने स्पर्श करत होता. एक दोन नव्हे तर तब्बल १५ ते २० विद्यार्थिंनीसोबत या नराधमाने हा प्रकार अनेकवेळेस केला. सुरुवातीला मुलींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वारंवार होत असल्याने त्यातील काही मुलींनी धाडस दाखवले आणि त्यांनी या प्रकाराची वाच्यता त्यांच्या पालकांकडे केली. मात्र, त्यानंतर मग पालकांनी संबंधित शालेय प्रशासनासह आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.(Nashik News)

Nashik | युवा हा देशाची ताकद अभिमान आणि स्वाभिमान – मंत्री दादा भुसे

विशाखा समितीची कारवाई 

या प्रकरणी पालकांच्या आणि विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्यानंतर कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने याबाबत चौकशी केली. सर्वप्रथम या समितीकडून संबंधित विद्यार्थिनींचे जबाब घेतले गेले. यावेळी मुलींनी त्या शिक्षकाने अनेक वेळा त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले असल्याचे सांगितले. चौकशी नंतर विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयाला हा अहवाल दिला. त्यानंतर आदिवासी विकास उपायुक्त विनीता सोनवणे यांनी पुढील कारवाई केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे ‘अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद’ आक्रमक झाली आहे. या परिषदेने थेट आंदोलनाचाही इशारा दिला आहे. (Nashik News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here