Nashik News | नाशकात ‘झिंगाट’ अधिकाऱ्याने एकापाठोपाठ तीन गाड्या उडवल्या

0
83
Nashik News
Nashik News

Nashik News |  पुण्यातील पॉर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर राज्यात हिट अँड रनच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने एकापाठोपाठ एक तीन गाड्यांना उडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. (Nashik News)

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने (Social Welfare Department Superintendent) नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) हद्दीत दोन चारचाकी आणि एका दुचाकीला उडवून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Nashik Voilence | नाशकात ५ तास दंगलीची धग, नागरिकांचा जीव मुठीत; नेमकं काय घडलं..?

दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी मद्यधुंद वाहनचालक समाज कल्याण विभागाचा अधीक्षक संशयित आरोपी विजय चव्हाण (Vijay Chavan) यास पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Nashik News | नेमकं काय घडलं..?

23 ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समाज कल्याण विभागाचे अधीक्षक विजय चव्हाण (वय 56) हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होते. यामुळे गडीवरील ताबा सुटल्याने पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली आणि यात या तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण याला ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली.

Bus Accident | नाशिकमध्ये एसटी बस व कारचा अपघात; वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा मृत्यू


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here