Bus Accident | नाशिकमध्ये एसटी बस व कारचा अपघात; वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा मृत्यू

0
89
Bus Accident
Bus Accident

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी |  नाशिक – दिंडोरी (Nashik News) रोड वर अक्राळे फाट्यानजीक एसटी बस व बलेनो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडली आहे. या अपघातात बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू तर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.(Bus Accident)

Nashik Accident | राहुड घाटात एसटी बस-ट्रकचा अपघात; आठ प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर कार ही नाशिककडे येत होती. तर बस कळवण कडे जात होती. त्यादरम्यान अक्राळे फाट्यानजीक या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्याने बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर एस.टी. बसने व कारने पेट घेतला. बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. तर, कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत असून, यापैकी चालकासह आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी पेत घेतल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here