Nashik | नाशिकमधील पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथा सोहळ्यात चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळालेला आहे. नाशिकच्या पाथर्डी गावात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या पाच दिवसांत महिलांचे लाखोंचे दागिने लंपास झालेले आहेत. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी महिलांना पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केलेली दिसुन आली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 56 महिलांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पोलिसांसमोर आता या चोरट्यांचा शोध घेऊन दागिने महिलांना मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे.
Spiritual news | २०२४ मध्ये ‘या’ राशींवर शनीची साडेसाती
पाथर्डी गावात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं होतं. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात 56 महिलांचे तब्बल एक किलो 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. सुमारे ५२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारत चोरट्यांनी ‘दिवाळी’च साजरी केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
पाथर्डी गावात 21 ते 25 नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत श्री शिवमहापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कथा ऐकण्यासाठी दररोज नाशिक शहर तसेच राज्यभरातून लाखो भाविक हजेरी येथे हजेरी लावत होते. त्यात लाखो महिलांचादेखील समावेश होता. कथा सोहळ्याला येताना सोन्याचे दागिने परिधान करू नये, स्वतःचे दागिने स्वतःच सांभाळावीत असे आयोजन समितीसह पोलिस प्रशासनानेदेखील वारंवार सांगितलेले होते. असे असतानादेखील हजारो महिला सोन्याचे दागिने परिधान करून कथा ऐकण्यासाठी येत होत्या. त्याचाच फायदा घेत सोनसाखळी चोरट्यांनी गर्दीत हातसफाई करीत 56 महिलांचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवलेले आहेत.
मनमाड-येवला मार्गावरील दोन अपघातांत नाशिकचे 5 तरुण; तर पुण्याचा एक जण ठार
दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यांमध्ये इतर महिलांना साक्षीदार करण्यात आलेले आहे. एकूण एक किलो 47 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे इंदिरानगर पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. या कथेदरम्यान सुमारे 550 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम