Skip to content

Nashik news | नुकसानग्रस्त शेतक-यांनी ७२ तासांच्या आत कृषी विभागास संपर्क साधावा


Nashik news | नाशिक जिल्ह्यात काल तसेच झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटमुळे शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. विशेषतः चांदवड, निफाड ह्या भागात कांदा तसेच द्राक्ष पिकांचे क्षेत्र असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यामुळे शेतकरी मात्र हतबल झाले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांनी तत्काळ ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर किंवा लेखी स्वरुपात कृषी विभागास कळवावे, असे आवाहन जिल्ह्याचे कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केलेले आहे.

मिळालेल्या माहितीनूसार द्राक्ष बाग हे मणी भरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाल्यानंतर तो शासनाला कळवण्यात येणार आहे.

Nashik | वारंवार आवाहन करूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथेत 52 लाखांचे दागिने चोरीला

त्याचप्रमाणे आजपासूनच जिल्ह्यात पंचनामे करण्याचे आदेशही दिले असल्याचेही साेनवणे यांनी सांगितले आहे. आदिवासी भागातही कापणीला आलेले तसेच काढून ठेवलेले भात पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांनी ७२ तासांच्या आत १८००११८४८५ ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ज्या ठिकाणी नेटवर्कची अडचण आहे.

त्यांनी लेखी स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यासंबंधी अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

Crime news | कैद्याच्या पोटात महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!