मनमाड-येवला मार्गावरील दोन अपघातांत नाशिकचे 5 तरुण; तर पुण्याचा एक जण ठार

0
1

मनमाड | पुणे-इंदूर महामार्गावर रविवारी (दि. २६) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन भीषण अपघातामध्ये सहा जण ठार झालेले आहेत. मनमाड-येवला मार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील नाशिकचे पाच तरुण जागीच ठार झालेले आहेत. मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ कंटेनर कारवर उलटून झालेल्या अपघातात कारचालक हा जागीच ठार झाला, तर चार जण गंभीर जखमी झालेले आहे.

 Nashik News | उत्पादन घटल्याने मका तेजीत; दरांत 20 टक्क्यांनी वाढ

मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गावर रविवारी दोन अपघात झालेले आहेत. मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडीजवळ कंटेनर (RJ 14 GP 3435) आणि कारचा (MH 12 MW 0918) अपघात झाला. समोरून भरधाव येणारा कंटेनर कारवर उलटला गेला. जखमींमध्ये क्रीडाशिक्षकाचादेखील समावेश आहे. कारमधील सर्व जण पुण्याचे रहिवासी असून उज्जैन येथून महाकाल दर्शन करून शिर्डीच्या साईंबाबाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झालेला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार चक्काचूर झाली. क्रेनच्या सहाय्याने दीड तासाच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त वाहने हटविण्यात आलेली आहे. अपघातामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झालेली होती. जखमींना मालेगाव आणि नाशिक येथे हलविण्यात आलेले आहे.

Nashik | रात्री गारपीट; सकाळी ८ वाजताच पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

मनमाड-येवला मार्गावर अनकवाडे गावाच्या पुढे रेल्वेपुलावर सायंकाळी कंटेनर (HR 38 AC 7061) आणि कारमध्ये (MH 06 AN 8890) समोरासमोर झालेल्या धडकेत नाशिकचे 22 ते 30 वयोगटातील पाच तरुण जागीच ठार झाले. श्रेयस धनवटे, गणेश सोनवणे, ललित सोनवणे, रोहित धनवटे, प्रतीक नाईक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण मनमाडजवळच्या कुंदलगावच्या म्हसोबा देवस्थानचा धार्मिक कार्यक्रम आटोपून येवलामार्गे नाशिककडे परतत असताना हा अपघात झालेला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. मृतांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. बेमोसमी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबवण्यात पोलिसांसह नागरिकांना अडथळा येत होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here