Spiritual news | २०२४ मध्ये ‘या’ राशींवर शनीची साडेसाती

0
2
Shani Dev
Shani Dev

: ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह हा न्यायाचा ग्रह तसेच कर्म ग्रह मानला जातो. शनि सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. २०२४ मध्ये शनि आपली स्थिती बदलणार असून, २०२४ मध्ये शनिचे संक्रमण होणार नाही. २०२४ मध्ये शनि हा कुंभ राशीतच राहील.

शनिने राशी बदलली नाही तरी स्थितीत मात्र बदल होईल. २०२४ मध्ये, शनी हा कुंभ राशीत असताना वक्री व मार्गी होतील. ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील वर्षात काही राशींवर शनिची साडेसाती व ढैय्या असणार आहे. शनीच्या ग्रहामुळे पुढील वर्षी कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनात काय बदल होणार आहेत ते जाणून घ्या.

‘या’ राशींवर साडेसाती असेल

पुढील वर्षी शनि हा कुंभ राशीत असल्याने मकर, कुंभ व मीन ह्या राशीच्या लोकांना शनिची साडेसाती भोगावी लागणार आहे. शनिच्या साडेसातीचे तीन टप्पे आहे. २०२४ मध्ये मकर राशीच्या लोकांवर शनिचा तिसरा टप्पा सुरू होईल. तर मीन राशीच्या लोकांसाठी शनिचा पहिला टप्पा सुरू आहे, जो २०२४ मध्येही सुरू राहील. तर, कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२४ मध्ये शनीच्या साडेसातीची दुसरा टप्पा सुरू होणार आहे. शनिच्या साडेसातीची दुसरी अवस्था ही अत्यंत क्लेशदायक समजली जाते. २०२४ मध्ये ह्या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

 Nashik News | उत्पादन घटल्याने मका तेजीत; दरांत 20 टक्क्यांनी वाढ

या राशीच्या लोकांना अडचणी

२०२४ मध्ये शनि हा कुंभ राशीत असल्याने वृश्चिक तसेच कर्क राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. शनिची ढैय्या ही अडीच वर्षांची आहे. ढैय्यात असलेला शनि ह्या राशीच्या लोकांना अडीच वर्षे त्रास देतो. पुढील वर्षी वृश्चिक व कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही काम अत्यंत काळजीपूर्वक करावे. विशेषत: या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना खूप सावधगिरी बाळगावी.

शनिची साडेसाती व ढैय्या टाळण्यासाठी हे करा

२०२४ मध्ये ज्या लोकांवर शनिची वाईट नजर असेल, त्यांनी होणारा त्रास टाळण्यासाठी काही विशेष उपाय करावेत.

१ . दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान तसेच शनि चालिसाचे पठण करावे.
२. शनि मंत्रांचा जप केल्यामुळेही शनिदेव प्रसन्न होतात.
३. गरजू व असहाय्य लोकांना दान करावे.
४. अशक्त, वृद्ध, स्त्रियांचा चुकूनही अपमान करू नये.

हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला संकटांपासून मुक्ती मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Gold Silver rate | सोन्याच्या दरांत चढ सुरूच; असे आहेत आजचे दर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here