Nashik Election | हिरे बंधूंसह डोखळे, गुळवे, कुंभार्डे दिग्गजांचे अर्ज झाले बाद

0
18

Nashik Election | नाशिक जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी (दि. ३०) छाननी झाली. यामध्ये 105 अर्जांपैकी तब्बल 30 अर्ज विविध कारणांनी बाद झालेले आहेत. (Nashik Election)

बाद झालेल्या अर्जांमध्ये प्रामुख्याने संस्था सोसायटी गटातील अपूर्व हिरे, अद्वय हिरे, राजेंद्र डोखळे,  संदीप गुळवे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, राजाभाऊ खेमनार, गुणवंत होळकर यांचा समावेश आहे. तर सोसायटी गटात अर्ज बाद झालेले असले, तरी यातील बहुतेकांनी OBC गटात अर्ज दाखल केलेले असल्याने, आता या गटासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (Nashik Election)

हेही वाचा –Breaking news | मोठी बातमी! ह्या जागा अजित दादा गट लढवणार

नाशिक जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या 15 जागांसाठी एकूण 105 अर्ज दाखल झालेले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी निवडणूक अधिकारी मनीषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली छाननी प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक अर्ज बाद झालेले आहेत. या निवडणुकीसाठी तीन वर्षांत संघाशी व्यवहार करणे क्रमप्राप्तची अट नसल्याने अनेकांचे अर्ज बाद झालेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्ज बाद झाल्यावर 15 जागांसाठी एकूण 70 उमेदवार रिंगणात असून अंतिम उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि. ०१) प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी खैरनार यांनी दिलेली आहे. दुसरीकडे सोयायटी गटात अर्ज बाद झालेले असले तरी हिरे बंधू यांच्यासह डोखळे, गुळवे यांचे OBC गटातील अर्ज वैध ठरलेले आहेत.

हेही वाचा –Rain Upadate | राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं सावट; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

OBC एका जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात राहिले असल्याने उमेदवारीसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संघाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर माघारीला शुक्रवारपासून सुरवात होणार आहे. माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.(Nashik Election)

वैध ठरलेले अर्ज कोणते?

संस्था-सोसायटी गट (७ जागा) ३६ १९ १७

वैयक्तिक सभासद गट (३ जागा) २३ १२ ११

महिला राखीव (२ जागा) १० ०१ ०९

अनुसूचित जाती-जमाती गट (१ जागा) ०४ ०१ ०३

इतर मागासवर्गीय गट (१ जागा) २५ ०१ २४

विशेष मागासवर्गीय गट (१ जागा) ०७ ०१ ०६

(Nashik Election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here