Nashik | नाशिक जिल्हा सर्वाधिक निरक्षर जिल्हा? इतक्या अंगठेबहाद्दरांची झाली नोंद

0
2

Nashik |  नवभारत साक्षरता ह्या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या निरक्षर व्यक्तींच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ९ हजार ७६० व्यक्तींची नोंदणी ही उल्हास अॅपवर करण्यात आलेली असून, १ हजार ३५२ स्वयंसेवकांची नोंदणीदेखील करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते ३५ वयोगटाला ह्या मोहिमेअंतर्गत शिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती ह्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे.(Nashik)

संपूर्ण भारत देश हा २०२७ पर्यंत साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून नवभारत साक्षरता हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण, तसेच स्वयंसेवकांना प्रशिक्षण व निरक्षरांना प्रशिक्षण अशा तीन टप्प्यांमध्ये हा उपक्रम विभागण्यात आलेला आहे.

जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधत ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील ह्या निरक्षरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. शिक्षकांना याबाबतच्या सर्वेक्षणाचे काम देऊन, उल्हास अॅपवर ही माहिती भरण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या.(Nashik)

Crime news | वाढदिवशीच बायको अन् मुलाला संपवलं; धक्कादायक खुलासा

पण, शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे या माहिती संकलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मागील अडीच महिन्यातील ह्या मोहिमेचा आढावा घेतला असता, राज्यभरात नाशिक जिल्हा हा निरक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात पहिला असल्याचेही यावेळी निदर्शनास आले आहे.

शिक्षकांकडून उल्हास ह्या पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या एकूण निरक्षरांची संख्या ही ९ हजार ७६० असली, तरी पहिल्या टप्प्यात १५ ते ३५ ह्या वयोगटातील व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाणार असून, ही संख्या आता ३ हजार ५४४ इतकी आहे. यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी उर्वरित ६ हजार २१६ व्यक्तींच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.(Nashik)

 

नोंदणीप्रक्रिया सुरू

नाशिक जिल्ह्यासाठी ह्या वर्षात ५६ हजार ५०६ इतक्या निरक्षरांना साक्षर करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण जिल्ह्याभरात यासाठी ५ हजार ६०६ इतक्या स्वयंसेवकांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. पण, या तुलनेत उल्हास अॅपमध्ये मात्र अद्याप नोंदणी करण्यात आलेल्या निरक्षरांची संख्या ही १७ टक्के इतकीच आहे. त्यामुळे अजूनही नोंदणीचे हे उरवारुत काम सुरू असून, याबाबत लवकरच आढावा बैठक देखील घेतली जाणार आहे.(Nashik)

TVS Sports Bike | अवघ्या ७ हजारांत घरी आणा TVS Sports बाईक!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here