Weather Update | गेल्या काही दिवसंपासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्यानंतर दोन दिवसांपासून राज्यात धुक्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दाट धुक्यामुळे काही अंतरावरील चित्र दिसनेही अशक्य होत नसून मोठ्या प्रमाणावर दव पडत आहे.
Nashik | नाशिक जिल्हा सर्वाधिक निरक्षर जिल्हा? इतक्या अंगठेबहाद्दरांची झाली नोंद
आज (दि. ३) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून यामुळे राज्यात पाऊस सुरूच आहे. शनिवारी (दि. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, धुळे, परभणी जिल्ह्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. (Weather Update)
TVS Sports Bike | अवघ्या ७ हजारांत घरी आणा TVS Sports बाईक!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुके पसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (दि. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 16.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
शनिवारी (दि. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंद केलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.९ (१६.६),
जळगाव २८.६(१९.०),
कोल्हापूर – (२१.६),
महाबळेश्वर २५.६ (१६.१),
नाशिक २९.१ (१९.२),
निफाड २८.२ (१८.५),
सांगली २८.९ (२१.९),
सातारा ३१.५ (१८.९),
सोलापूर ३२.०(१९.८),
सांताक्रूझ ३१.० (२१.२),
डहाणू २९.० (२१.८),
रत्नागिरी ३२.५ (२२.६),
छत्रपती संभाजीनगर २८.४ (२०.४),
नांदेड २९.६ (१९.८),
परभणी २५.६ (१९.६),
अकोला २४.७ (२०.२),
अमरावती २५.८ (१९.५),
बुलडाणा २५.४ (१८.६),
ब्रह्मपुरी ३२.४ (१९.६),
चंद्रपूर ३१.२(१८.०),
गडचिरोली ३०.४ (१७.८),
गोंदिया ३०.० (१८.६),
नागपूर २८.०(१९.८),
वर्धा २७.०(१९.८),
वाशीम २९.४(१८.४),
यवतमाळ २९.७ (१८.२).
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम