Election Result | चार राज्यांत आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?

0
21

Election Result | नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून बघितल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण या चार राज्यांत आज, रविवारी(दि. ०३) रोजी मतमोजणी होणार आहे. मिझोराममध्ये उद्या, सोमवारी(दि. ०४) रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

Weather Update | पावसानंतर राज्यात धुक्याचे ‘राज्य’

या चार राज्यांतील लढतींचे चित्र काय?

 

प्रियांका गांधी- राहुल गांधी- नरेंद्र मोदी- के.चंद्रशेखर राव

– राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे.

– मध्य प्रदेशात भाजप, तर तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे.

– छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे.

– तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समिती प्रमुख स्पर्धक असून, सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत.

Nashik | नाशिक जिल्हा सर्वाधिक निरक्षर जिल्हा? इतक्या अंगठेबहाद्दरांची झाली नोंद

कोठे किती जागा?

 

राजस्थान-१९९

 

मध्य प्रदेश -२३०

 

छत्तीसगड -९०

 

तेलंगण -११९

 

निकालाबाबत उत्सुकता

मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये एकसूर नसल्याने निकालाबाबत आणखीनच उत्सुकता आहे. मध्य प्रदेशात एकूण २३०, छत्तीसगडमध्ये ९०, तेलंगणमध्ये ११९, तर राजस्थानात १९९ जागांसाठी मतदान पार पडलेले आहे. मतमोजणी केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे.

तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी आज पार पडणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दहा वाजेपर्यंत मतदानाचा पहिला कल समजू शकेल. तेलंगणामध्ये 49 केंद्रांवर मतमोजणी पार पडेल तर राज्यात 119 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे 71 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. छत्तीसगडमधल्या एकूण 1 हजार 181 उमेदवारांचं भवितव्य स्पष्ट होऊ शकते. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया 36 केंद्रांवर होणार आहे. या जागांसाठी 8 हजार ६२ उमेदवार रिंगणात आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here