Big News | गुणमोजणीचा फॉर्म्युला बदलला! दहावी-बारावीत आता टक्केवारी अन् श्रेणी नाही

0
4
CBSE Exam 2024
CBSE Exam 2024

Big News | पुणे : दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात महत्वाचे अपडेट दिलेले आहे. या परीक्षेत आता विद्यार्थ्यांना टक्केवारी किंवा श्रेणी दिली जाणार नाहीये. CBSEने 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून हा बदल जारी केला आहे. यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माध्यमांना माहिती दिली. आता सीबीएसई ओव्हरऑल डिव्हीजन आणि डिस्टिंक्शन देणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी पाच पेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असेल तर प्रवेश देणारी संस्था बेस्ट 5 विषयांचे गुण घेऊन प्रवेश देऊ शकते.

Weather Update | पावसानंतर राज्यात धुक्याचे ‘राज्य’

नवीन पद्धत काय असणार?

CBSE चे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात परिपत्रक काढलेले आहे. त्यात नमूद केले आहे की, येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी किंवा श्रेणी दिली जाणार नाही. यासंदर्भातील तरतूद CBSE च्या नियमावलीत करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था निर्णय घेऊ शकते. आता विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम पाच विषय निवडून प्रवेश दिला जाणार आहे. यंदापासून सीबीएसईकडून गुणांची टक्केवारी आणि श्रेणी दिली जाणार नाही. तसेच नोकरीसाठी गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास नोकरी देणारी नियोक्ता संस्था विषयांवरुन निर्णय घेऊ शकतात. ही संस्था गुणांची बेरीज करुन टक्केवारी काढू शकणार आहे. सीबीएसईने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची पद्धत बंद केलेली आहे. त्यानंतर आता श्रेणी आणि टक्केवारी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे.

Election Result | चार राज्यांत आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?

CBSE परीक्षांच्या तारखा जाहीर

CBSE ने दहावी आणि बारावीची परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. जवळपास 55 दिवस  या बोर्डाच्या परीक्षा चालणार आहे. दहावीची परीक्षा 21 मार्च तर बारावीची परीक्षा 5 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सीबीएसईचा वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेला 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसलेले होते. बारावीच्या परीक्षेला 16 लाखांहून अधिक बसले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here