TVS Sports Bike | अवघ्या ७ हजारांत घरी आणा TVS Sports बाईक!

0
22

TVS Sports Bike | भारतातील ऑटो मार्केटमध्ये अनके कंपन्यांच्या उत्तम दुचाकी उपलब्ध आहेत. या दुचाकीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळते आहे. परंतु बाईकच्या किमती जास्त असल्याने कमी बजेट असलेल्या ग्राहकांना त्या खरेदी करता येत नाहीत.

तुमचेही बजेट कमी असेल आणि तुमच्या स्वप्नातील बाईक खरेदी करायची असेल तर काळजी करू नका. कारण आता TVS Sports Bike ही तुम्ही अवघ्या 7 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकतात. या बाईकची किंमत देखील कमी आहे तसेच मायलेज देण्यास देखील सक्षम आहे.

TVS Sports बाईक किंमत काय? 

कमी बजेट ग्राहकांसाठी TVS Sports Bike हा उत्तम पर्याय आहे. या बाईकमध्ये उत्कृष्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत. TVS Sports Bike ची एक्स शोरूम किंमत 64,050 रुपये इतकी आहे. तर याच बाईकची ऑन रोड किंमत 75,082 रुपये इतकी आहे.

TVS Sports Bike वर फायनान्स प्लॅन दिला जातो आहे. त्यामुळे कमी बजेट ग्राहक अगदी 7 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट भरून बाईक घरी आणू शकतात. फायनान्स प्लॅनबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही जवळच्या TVS डिलरशिपला भेट देऊन हा बाईक घेऊ शकता.

TVS स्पोर्ट्स फायनान्स योजना काय?

TVS Bike कंपनीकडून त्यांच्या स्पोर्ट्स बाईकवर उत्तम फायनान्स प्लॅन देण्यात आलेला आहे. 7,000 रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये ही स्पोर्टस बाईक ग्राहक घरी आणू शकतात. 7,000 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला 68,000 रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाऊ शकते. या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक 9.7 टक्के व्याजदर आकारले जाणार आहे. हे बाईक कर्ज तुम्हाला 36 महिन्यांसाठी दिले जाईल. 36 महिन्यांमध्ये दरमहा तुम्हाला 2,187 रुपये इतका EMI भरावा लागेल.

Mumbai | अर्धी मुंबई रिकामी होणार?; धक्कादायक कारण आलं समोर…

TVS स्पोर्ट्स इंजिन आणि वैशिष्ट्ये-

TVS Sports Bike मध्ये शक्तिशाली 109.7 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन चार-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. बाईकला 10 लीटरची इंधन टाकी दिलेली आहे. तसेच TVS स्पोर्ट्स बाईकला ARAI कडून 70 Kmpl मायलेजचे प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे.

एकदा टाकी फुल भरल्यानंतर बाईक 700 किमी पर्यंत चालू शकते. बाईकला टेलिस्कोपिक आणि हायड्रॉलिक शॉक सस्पेन्शन दिलेले आहे. पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here