Skip to content

Infotech news | ह्या कंपनी देताय स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट; बघा ऑफर


Infotech news |  लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या Vivo ह्या कंपनीने Vivo Y56 तसेच Vivo T2 5G ह्या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात केलेली आहे. ज्यामुळे आता हे मॉडेल जबरदस्त डिस्काउंट व बंपर ऑफर्ससह तुम्हाला परवडेल अशा किंमतीत तुम्हाला विकत घेता येणार हेत.

चला Vivo Y56 आणि Vivo T2 5G या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या मॉडेलवर मिळणाऱ्या डिस्काउंट व ऑफर ची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. विवोचे हे मिडरेंजमधील स्मार्टफोन्स आता नवीन किंमतीत ग्राहक Flipkart, Vivo ऑनलाइन स्टोर यसारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म किंवा रिटेल स्टोर्सवरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विकत घेऊ शकणार आहेत.(Infotech news)

Vivo T2 5G वर मोठा डिस्काउंट

Vivo T2 5G चा ६जीबी + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट हा १६,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आलेला आहे. तर ८जीबी + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट हा १८,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. तसेच ग्राहक Vivo T2 5G ह्या स्मार्टफोनच्या खरेदीवर IndusIand Bank, Yes Bank, Federal Bank व Bank of Baroda यासारख्या विविध बँकांच्या कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यावर १,५०० रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळवता येणार आहे.

Vivo T2 5G मध्ये ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह ६.३८-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देखील मिळत आहे. ज्याचे रिजॉल्यूशन हे १०८० x २४०० पिक्सल इतके आहे. Vivo T2 5G हा ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी चिपसेटसह आलेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्ट असलेला ६४ मेगापिक्सलचा अँटी-शेक प्रायमरी कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन ४५०० एमएएचच्या बॅटरीसह आलेला आहे. जी ४४ वॉट फ्लॅशचार्जला देखील सपोर्ट करते..(Infotech news)

Mumbai | अर्धी मुंबई रिकामी होणार?; धक्कादायक कारण आलं समोर…

Vivo Y56 वर डिस्काउंट

Vivo Y56 चा ४जीबी + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट हा स्मार्टफोन १५,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आलेला आहे. तसेच ८जीबी + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंट हा १७,९९९ रुपयांमध्ये मिळत आहेत. ग्राहक Vivo Y56 ची खरेदी करताना ICICI Bank, Yes Bank, IndusInd Bank व Onecard द्वारे पेमेंट करून १,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅकदेखील मिळवू शकतात. तसेच, Vivo चा V-Shield प्लॅन (संपूर्ण डिव्हाइस प्रोटेक्शन प्लॅन) हा आकर्षक डिस्काउंटसह विकत घेऊ शकतात..(Infotech news)

Vivo Y56 5G मध्ये ६.५८ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी + डिस्प्लेदेखील देण्यात आलेला आहे. ज्याचे रीजोल्यूशन २४०८ × १०८० पिक्सल व रिफ्रेश रेट हे ६० हर्ट्झ इतके आहे. तसेच, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 चिपसेटवर चालतो. Vivo Y56 मध्ये ५० मेगापिक्सलचा नाइट प्रायमरी कॅमेरा व २ मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरादेखील देण्यात आलेला आहे.

Crime News | दोन बायका, ९ मुलं अन् ९ गर्लफ्रेंड; सोशल मीडिया स्टारला झाली अटक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!