Sharad Pawar | संघटना स्वच्छ झाली’, आणि काय म्हणाले शरद पवार..?

0
2

Sharad Pawar |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. ह्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही निर्देश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट सोबत नेत राष्ट्रवादी फोडला. मात्र, शरद पवारांनी या घटनेला जास्त महत्त्व न देण्याचा सल्लाही यावेळी बैठकीत तरुणांना दिला. ह्या घटनेमुळे उलट तरुणांना अधिक संधी मिळेल असंही पवार यावेळी म्हणाले. तसेच राष्ट्रवादीतील ह्या फुटीच्या घटनेवर त्यांनी १९७८ मध्ये घडलेल्या एका घटनेचा इतिहास सांगितला आहे. तसेच अजित दादांच्या ह्या बंडाच्या घटनेवर शरद पवार यांनी संघटना स्वच्छ झाली, असा टोलादेखील लगावला आहे.(Sharad Pawar)

“मला आठवतंय, मी १९७८ साली तरुणांना संधी देऊन निवडणुकीच्या रणांगणात आणलं. निवडणुका झाल्यानंतर सरकार दुसऱ्याचं आलं. काही दिवसांसाठी मीही परदेशात गेलेलो होतो. मी परत आलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं. ६० आमदार निवडून आलेले होते. त्यातील ६ शिल्लक राहीले होते. बाकीचे सर्व अन्य पक्षात गेलेत. त्यामुळे हे साहजिकच होतं की, ६० वरुन आम्ही ६ वर आलो”, अशी आठवणही शरद पवारांनी बोलताना सांगितली.

Infotech news | ह्या कंपनी देताय स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट; बघा ऑफर

संघटना स्वच्छ झाली

“जे काही घडलं आहे त्याची तुम्ही चिंता करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे उलट आपली संघटना ही स्वच्छ व्हायला लागली आहे. त्याही पेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची परिस्थिती देखील आज निर्माण झालेली आहे. युवकांची संघटना ही आपण मजबूत करु शकलो तर, माझी खात्री आहे, उद्या निवडणुका होतील त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस युवकची एक नवीन फळी निर्माण झालेली असेल. ते हे राज्य चालवतील, जनतेची प्रश्न सोडवतील. ही वेळ नक्की येईल”, असा विश्वासही यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.(Sharad Pawar)

“तुम्हा सर्वांना ही नवीन संधी मिळालेली आहे. आपला विचार हा शेवटपर्यंत पोहचवण्याचं काम करूयात. नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची क्षमता ही तुमच्यात आहे. काही लोकांनी त्यांचे नवे प्रश्न तयार केलेत, टीका केलीत. त्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरजच नाही. जेव्हा लोकांमध्ये जाल, तेव्हा काही प्रश्न लोकं विचारतील म्हणून ते आज बोलत आहेत. सत्ता येते तशी जाते, सामान्य लोकांचा पाठींबा हाच महत्वाचा आहे”, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.Sharad Pawar

“तुमचा कार्यक्रम हा काय होता, तुम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं व आता कुणासोबत गेलात, अशी प्रश्न लोक विचारणार आहेत. लोकसभेची निवडणूक ही ३ ते ४ महिन्यांवर आलेली आहे. वेगळं वातावरण तयार करण्याचे काम कोणी करत असेल तर, महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं हे काम तुम्ही करा”, असं आवाहनही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवारांनी केलं.

Mumbai | अर्धी मुंबई रिकामी होणार?; धक्कादायक कारण आलं समोर…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here