Crime news | वाढदिवशीच बायको अन् मुलाला संपवलं; धक्कादायक खुलासा

0
49

Crime news |  कर्जबाजारी असलेल्या दीपक गायकवाड याने पत्नीसह आपला लहान मुलगा आदिराज याची हत्या करून फरार झालेला होता. ह्या आरोपीला पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केलेली आहे. मुलगा आदिराज व पत्नी अश्विनी यांच्या वाढदिवसाच्या काही तास आधीच त्यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला आहे. त्याने हत्या का आणि कशी केली? याचा खुलासा हा तपासात उघड होत आहे. पण, त्याच्या आरोपीच्या अशा कृत्यानंतर त्याच्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केली होती.(Crime news)

उच्चभ्रू आयुष्य जगण्याच्या स्वप्नाने पेटलेल्या आरोपी दीपक ह्याने कल्याण शहरातील मध्यवर्ती भागात निधी रिसर्च फर्म फायनानशियल कन्सलटंट कंपनी थाटलेली होती. गुंतवणूकदारांना ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत करोडो रुपयांची त्याने गुंतवणूक करून घेतली होती.

सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला परतावाही त्याने दिला. पण, त्यानंतर त्याचा हा व्यवसाय बुडल्याने गुतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावलेला होता. कल्याणात खेळण्याची चार ते पाच दुकाने थाटून बसलेल्या ह्या आरोपी दीपककडे तब्बल १०० कामगार हे कार्यरत होते. पण, मागील चार ते पाच महिन्यापासून ह्या कामगारांना त्याने पगारही दिलेला नव्हता.(Crime news)

TVS Sports Bike | अवघ्या ७ हजारांत घरी आणा TVS Sports बाईक!

कर्जबाजारी असलेल्या दीपकने शुक्रवारी (दि. १ डिसेंबर) रोजी टोकाचे पाऊल उचलत त्याने पत्नी व मुलाच्या जेवणात विष घातले. यात चिमूरड्याने जागीच जीव सोडला तर पत्नी ही अत्यवस्थ झालीत. मात्र, निर्दयी दीपकने उषीने पत्नीचे तोंड दाबून तिची निर्घुण हत्या केली. तर फक्त ७ वर्षांच्या चिमुकल्या आदिराजने आधीच जगाचा निरोप घेतलेला होता. पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यानंतर आरोपी दीपक याने पंख्याला साडी बांधून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.

पण, त्याने हा मत बदलले आणि तो पळून गेला. आपल्या चारचाकी गाडीने तो संभाजीनगरच्या दिशेने जाताना त्याने आपल्या भावाला व त्यानंतर पत्नीच्या भावालाही फोन करून आपण हत्या केल्याचेही त्याने सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मोबाइलच्या लोकेशनवरून त्याचा पाठलाग केला आणि त्याला संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत त्याने हत्या का आणि कशी केली? त्याचा उलगडा होऊ शकेल असेही यावेळी पोलिसांनी सांगितले.(Crime news)

Infotech news | ह्या कंपनी देताय स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट; बघा ऑफर

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांच्या नातेवाइकांनी घेतल्यामुळे कल्याण पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे तगडे आव्हान होते.

५ किलोच्या केकची ऑर्डर

आई व मुलाचा आज एकाच दिवशी २ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. यासाठी पत्नीने ५ किलोच्या केकची ऑर्डर आईने दिलेली होती. नातेवाईकांना वाढदिवसासाठी बोलवतानाही ती आनंदात होती. पण, वाढदिवसाचा केक हा आणण्यापूर्वीच तिने आपल्या चिमूरड्या मुलासह जगाचा निरोप घेतला. आई आणि मुलाचा जन्मदिवस व शेवटचा दिवस एकाच दिवशी ठरल्याने नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. (Crime news)

Sharad Pawar | संघटना स्वच्छ झाली’, आणि काय म्हणाले शरद पवार..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here