Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला

0
30
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  नाशिकमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ड्रग्स प्रकरण, हत्यांच्या घटना ह्या अनेक पटींनी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच नशिक शहरात पंचवटी परिसरात नंदुरबार येथील एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान, आता यानंतर आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून, नशिक शहरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हॉस्पिटलच्या (ICU) अतिदक्षता विभागामध्येच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

तर, शुक्रवारी (दि. २३ फेब्रुवारी) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या खासगी डॉक्टरवर हा हल्ला करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये काल रात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून, सुयोग हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात खासगी डॉक्टर कैलास राठी यांच्यावर एका धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले आहेत. दरम्यान, या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हा हल्लेखोर पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Nashik Crime | नशिकमध्ये पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

याआधीही झाली होती अशी घटना

नाशिकमध्ये याआधीही अशी घटना घडली असून, २०२२ मध्ये असा एक सुद्धा अशा प्रकारची घटना घडली होती. नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ असलेल्या एका डॉक्टरवर हल्ला झाला होता. नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, डॉक्टर प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याची घटना ही ताजी असतानाच यानंतर आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला झाला होता. एकाच दवाखान्यात काम करणाऱ्या वॉर्डबॉयने या महिला डॉक्टरला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्यात या महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या होत्या. तर, या प्रकरणात आरोपी हल्लेखोर असलेल्या वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.

Nashik Crime | नाशिकमधील नामांकित शाळेत व्यसनाधीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here