Nashik Crime | नाशिकमधील नामांकित शाळेत व्यसनाधीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
151
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime | गेल्या काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकमधील शिंदे या गावात छापा टाकला होता. त्यावेळी कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर याच गावात नशिक पोलिसांनी छापा टाकला होता. यानंतर नशिकच्या ड्रग्स प्रकरणावरुन अनेक राजकीय दावे प्रतिदावे रंगले होते. मात्र, यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेले अवैध ड्रग्स कारखाने आणि त्यांची तस्करी उघडकीस आली होती. आता कुठे हे प्रकरण शांत झाले होते की, त्यातच आता पुन्हा एकदा नाशिकच्या एका नामांकित शाळेतून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. (Nashik Crime)

या घटनेत एका व्यसनाधीन आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलीने शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना उघडकिस आली आहे. मुलीच्या दप्तरा ई-सिगारेट सापडल्याने शाळेच्या शिक्षकांनी तिच्या पालकांना याबाबत माहिती दिल्याच्या रागातून या आठवीतील विद्यार्थिनीने थेट शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१५) रोजी सकाळी नाशिक शहरामधील गोल्फ क्लब मैदानाशेजारील सेंट फ्रान्सिस या नामांकित शाळेत घडली. ही संबंधित विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समो आली आहे. (Nashik Crime)

Maratha Reservation | नशिकचे आमदार ढिकलेंच्या घराबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, नाशिकमधील सेंट फ्रान्सिस या शाळेतील आठवीच्या वर्गात नेहमीप्रमाणे विद्यार्थी आपापल्या वर्गात आले. त्यावेळी येथील वर्गशिक्षकांना एका विद्यार्थिनीच्या दप्तरात ई-सिगारेट नजरेस पडली. ही बाब वर्गशिक्षकांनी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना सांगितली. यामुळे रंगाच्या भरात संतप्त विद्यार्थिनीने त्या शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून, शिक्षकांनी तिला तातडीने मुंबई नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. तर, घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी तिच्या पालकांशी चर्चा केली असता, ती व्यसनाधीन असल्याचे समोर आले आहे. (Nashik Crime)

Malegaon | मनपाची आर्थिक हितविरोधी कचरा संकलन निविदा प्रक्रिया रद्द करावी

पालकांनी तक्रार दाखल केली नाही 

या संबंधित विद्यार्थिनीच्या दप्तरात ई-सिगारेट आढळल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी तातडीने तिच्या पालकांशी चर्चा केली असता, त्यावेळी तिच्या पालकांनी ती व्यसनाधीन असल्याचे पोलिसांना सांगितले. आम्ही तिला वेळोवेळी व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, तरीही तिचे व्यसन सुटत नसल्याचेही यावेळी पालकांनी सांगितले. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचीही माहिती समोर आले आहे. (Nashik Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here