Maratha Reservation | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चौथ्या वेळेस उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून, कालपासून त्यांची प्रकृती ही चांगलीच खालावली आहे. आज सकाळीच राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सरकारसमोर सादर करण्यात आला आहे. तर, २० तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरांत स्थानिक आमदारांच्या घरांबाहेर मराठा समाजबांधवांकडून आंदोलन केले जात आहे. याचेच पडसाद आता नाशिकमध्ये उमटल्याचे दिसत आहे. नशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर, यावेळी आमदार ढिकले यांनी जमलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि निवेदन स्विकारले.(Maratha Reservation)
Maratha Reservation | जरांगेंना आंदोलनाची गरज नव्हती; काय म्हणाले मुख्यमंत्री..?
Maratha Reservation | अशा आहेत मागण्या…
- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे,
- सापडलेल्या ५५ लाख कुणबी नोंदीच्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे,
- सगे-सोयऱ्यांबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करावे आणि अंमलबजावणी करावी.
- मराठा आंदोलकांवर दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावे,
- शिंदे समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी.
- तसेच या समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार द्यावे.(Maratha Reservation)
- राज्य मागासवर्ग आयोगास मुदतवाढ द्यावी आणि मराठा समाजाचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावे.
वरील सर्व मागण्यांसंदर्भात येत्या २० फेब्रुवारीला बोलविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या बाजूने आमदार म्हणून आपण आक्रमकपणे सभागृहात समाजाची भूमिका मांडावी, असे न केल्यास आपण मराठा आरक्षणाच्या मुद्दयाबाबत उदासीन आहात, असे समजले जाईल. तसेच आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाज हा आपल्या बाबतीत योग्य ती भूमिका घेईल याचीही आपण नोंद घ्यावी. असे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार ढिकले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Maratha Reservation)
Nashik News | नाशिकमध्ये बबनराव घोलप यांनी ठाकरेंची साथ सोडली; ‘हे’आहे कारण..?
काय म्हणाले आ. राहुल ढिकले..?
दरम्यान, यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांसोबत आमदार राहुल ढिकले यांनी संवाद साधला. ते म्हणाले की,”मराठा समाजाला राज्य सरकार कायद्याच्या चौकटित टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी देखील आपल्यातील एक मराठा समाजाचा बांधव असून, यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये मी देखील सामील झालो होतो.
राज्य सरकारकडून मंगळवार (दि.२०) रोजी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मी आपल्या मागण्यासाठी आवाज उठवणार असल्याचे आश्वासनही यावेळी राहुल ढिकले यांनी दिले. तर, यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर, आशिष हिरे, दिपक दहिकर, सचिन पवार, सुनील निरगुडे, स्वाती कदम, रोहिणी उखाडे, योगेश नाटकर, संजय फडोळ, डॉ.सुबोध पाटील आदींसह मराठा आंदोलक उपस्थित होते.(Maratha Reservation)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम