Deola | देवळा महाविद्यालयाचे खेळाडू बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम

0
58
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी देवळा |  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० ते १३ फेब्रुवारी यादरम्यान आयोजित राज्यस्तरीय शासकीय शालेय बाॅलबॅडमिटंन स्पर्धेत जिल्ह्यातील देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील १९ वर्षांखालील मुलांच्या संघात निलेश भदाणे, शुभम पवार, हितेश शेवाळे, मयूर पवार, अजय जाधव, कुणाल गुंजाळ, प्रमोद गवळी, समीर भदाणे, प्रथमेश गाढे, चैतन्य शिरसाठ, यांनी सहभाग नोंदवला तर १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

Maratha Reservation | नशिकचे आमदार ढिकलेंच्या घराबाहेर मराठा समाजाचे आंदोलन

या यशामुळे नाशिक विभागाला पहिल्यांदाच हा मान मिळाला. मुलींच्या संघात रोहिणी गायकवाड, प्रांजल बच्छाव, पूनम पावर, निकिता मळणे, सोनाली जगदाळे, प्राजक्ता बागुल, सोनाली निकम, अस्मिता शिरसाठ, ललिता कदम, दिक्षा वाघ यांचा ट्राॅफी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, संस्थेच्या सचिव डॉ. मालती आहेर, उपप्राचार्य व शारीरिक शिक्षण संचालक पी. एन. ठाकरे, उपप्राचार्य बी.के.रौदळ, क्रीडा शिक्षक प्रा. तुषार देवरे, माजी खेळाडू दिलीप गुंजाळ यांनी खेळाडूंना ट्रॅकसूट देऊन खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here