Deola | माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी स्वामी समर्थ केंद्रात स्वखर्चाने बसवले सीसीटीव्ही

0
58
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिल्याने मंदिराच्या सेवेकऱ्यांनी पवार यांचे आभार व्यक्त केले.
देवळा पोलीस ठाण्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील स्वामी समर्थ केंद्रात गुरुवारी (दि ८) फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील दान पेटी फोडून जवळपास पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे मंदिरांचा देखील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे.(Deola)

Deola | देवळा येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दरम्यान, देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी ह्या केंद्राच्या सेवेकऱ्यांची मागणी विचारात घेऊन मंदिरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले आहेत. पवार यांच्या ह्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात असून, सेवेकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर आहेर, कांतीलाल देशमुख, शांताराम आहेर, राजू येवले, शिरसाठ रूपाली आहेर, रेखा आहेर, संगीता आहेर, उमा कांबळे, जाधव, हिरे, शिवदे, शेवाळकर आदी सेवेकरी उपस्थित होते. आभार विजय शिंदे यांनी मानले.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here