Nashik Crime | कौटुंबिक वादातून केलेल्या हत्येप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

0
57
#image_title

Nashik Crime | नाशकात हमालीच्या वादातून नातलगांवर हल्ला करून खून केल्याप्रकरणी, जिल्हा न्यायालयाकडून 7 जणांना जन्म ठेपेची शिक्षा व 35 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 13 जून 2018 रोजी फुलेनगर येथील आरोपींनी सुनील सुखलाल गुंजाळ याचा खून केला होता. आरोपींमध्ये पाच सख्खे भाऊ व एका महिलेचा समावेश आहे.

Nashik Crime | नाशकात पोलीस अधीक्षकाचा मुलावर प्राणघातक हल्ला; दिली जीवे मारण्याची धमकी

हमालीच्या वादातून झाली होती हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ नामदेव गायकवाड, जयराम नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरज नामदेव गायकवाड, अंबिका अर्जुन पवार, संदीप चंद्रकांत पवार व राहुल चंद्रकांत पवार अशी या आरोपींची नावे आहेत. सुनील गुंजाळ व आरोपी एकमेकांचे नातलग होते. ते मार्केट यार्डात हमालीची कामे करायचे. त्यांच्यात वाद झाल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, 13 जूनला सकाळी 9 च्या दरम्यान आरोपींनी सुनील गुंजाळ यांच्यासह सागर माने व दीपक गोराडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने सुनील याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime | गॅंगस्टर अबू सालेमला भेटायला आलेल्या दोघा जणांची एटीएसकडून कसून चौकशी

न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला

तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढमाळ यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. गोरवाडकर व डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यांनी सातही आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावत शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मधुकर पिंगळे एस. टी. बहिरम यांनी कामकाज पाहिले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here