Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “आम्ही जातीपातीचे, धार्मिक राजकारण करायचे नाही असा पवित्रा घेतला असून, यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शांवर काम करत आहोत.” असा दावा करत पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले.
Ajit Pawar | अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण; अजित पवारांची मोठी घोषणा
अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला
मंगळवारी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देवळाली मतदारसंघातील सय्यदप्रिंपी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. यानिमित्त आयोजित सभेमध्ये अजित पवारांनी, “देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी आणि छावणी मंडळ अशा तीन भागात विभागलेला असून या तीनही भागातील रस्ते, आरोग्यसेवा व आवश्यक विकास कामांसाठी अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिक रोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे व 13500 कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पाला देखील मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे.” असे सांगत वारकऱ्यांसाठी देखील ठोस उपक्रम हाती घेण्याच्या आश्वासन, यावेळी दिले.
आमदार सरोज अहिरे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले
यावेळी त्यांनी, “विविध जणांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा उल्लेख देखील केला निवेदनांमधील काही प्रश्न केंद्र तसेच राज्य सरकारशी संबंधित आहेत. द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून निवडणूक झाल्यानंतर हे प्रश्न सोडवले जातील.” असे आश्वासन यावेळी दिले. दरम्यान, आमदार सरोज अहिरे यांनी काही प्रश्न त्यांयासमोर मांडले. “सध्या शहरात विजेचा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांची वीजदेयके माफ झाली असली परंतु, दोन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे पीके अडचणीत आली असून भारनियमनामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.” हे प्रश्न सोडवण्याची मागणी यावेळी आमदार अहिरे यांच्याकडून करण्यात आली.
Ajit Pawar | मुख्यमंत्री पदाबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य; विरोधकांच्या टीकेला दिले पूर्णविराम
मी बहिणींचा ऋणी आहे
तसेच, लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना सबल करायचा आमचा हेतू आहे. आचारसंहिता पहिला आठवड्यात लागणार हे माहित होते. म्हणूनच, लवकरात लवकर खात्यात पैसे टाकण्यात आले. राखी पौर्णिमेनिमित्त जे पैसे दिले त्याचप्रमाणे, भाऊबीजेची ओवाळणी दिल्याचे खूप समाधान वाटते. काही लोकांच्या पोटात दुखले ते कोर्टातही गेले. मी बहिणींचा ऋणी आहे.” असे म्हणत, मी जगातील सर्वाधिक भाग्यवान भाऊ असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच तुमची योजना चालू ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. विरोधक बोलतील, “आम्ही योजना देऊ…मग एवढे दिवस झोपा का काढल्या?” असा खोचक सवाल विचारत पवारांनी विरोधकांवर टोला लगावला. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही सर्वांना मदत करतो. 44 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे. हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम