Rupali Chakankar | राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाव चर्चेत होते. येत्या निवडणुकीत रूपाली चाकणकरांची आमदारकीची संधी जरी चुकली असली. तरी त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपतदी नियुक्ती करण्यात आली आहे. या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपला होता. परंतु, त्यापूर्वीच आयोगाच्या अध्यक्ष पदाची धुरा चाकणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चाकणकर यांच्या नियुक्तीचे गॅझेट नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आमदारांच्या यादीतून नाव वगळलं होतं
या सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार अशी चर्चा होती. पण छगन भुजबळ यांनी आपल्या मुलासाठी हट्ट धरल्याने चाकणकरांचे नाव मागे पडले. त्यात एकाच व्यक्तीला सगळी पद देणार का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी विचारला होता. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादी चाकणकर यांचे नाव नव्हते. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला. तरी रुपाली चाकणकर यांचे पद कायम राहणार आहे. पुढील तीन वर्षे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदी कायम राहणार असून प्रोटोकॉलनुसार या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे महिला संघटन मजबूत करण्यावर भर
महिलांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या म्हणून रूपाली चाकणकर यांची ओळख आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात फिरून राष्ट्रवादीचे महिला संघटन अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला असून आत्ता राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम