Nashik Crime | नाशिकमध्ये तोतया डॉक्टरने महिला वकिलाला लुबाडले

0
43
#image_title

Nashik Crime | नाशिकमध्ये एका तोतया डॉक्टरने महिलेला वजन कमी करण्याची आशा दाखवत लुबाडले आहे. वजन कमी करण्याच्या बहाण्याने महिलेला व्हिडिओ कॉल करत त्यावरून चित्रीकरण करीत व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये संशयित निलेश अशोक पगार उर्फ अनिल पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | नाशिक जिल्हा रुग्णालयात चक्क जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

वजन कमी करण्याच्या बहाणा देत संपर्क साधायचा

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताने वकील महिलेशी संपर्क साधत आपण डॉक्टर असून वजन कमी करण्यासाठी उपचार करू असे सांगितले. त्यांनी उपचाराच्या बहाण्याने महिलेला व्हिडिओ कॉल केला त्यावरून महिलेचे चित्रीकरण करत फोटो काढले आणि त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने महिला वकिलाकडून 4 लाख 24 हजार रुपये उकळले. त्यापैकी 3 लाख 44 हजार रुपये परतही केले. दरम्यान महिलेस निलेश हा तोतया डॉक्टर असल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्यासोबत संपर्क तोडला. मात्र, संशयिताने मोबाईल वरून महिलेचा पाठलाग करून तिला त्रास दिला. त्यानंतर मंगळवारी दुपारच्या वेळेस संशयिताने महिला वकिलाच्या कार्यालयात जाऊन पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी केली व पैसे दिले नाही तर महिलेचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर मात्र महिलेने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Nashik Crime | नाशकात महिलेवर चुकीचे उपचार करून डॉक्टरचा नुकसान भरपाई देण्यास नकार

संशयिता विरोधात आधीच गुन्हा दाखल

हे प्रकरण उघडकीस येताच संशयित नील पाटील याने स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत यापूर्वी देखील महिलेला अशाप्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. याआधी देखील इंदिरानगर येथील महिलेस उपचाराच्या बहाण्याने व्हिडिओ कॉल करून तिचे चित्रीकरण व फोटो काढून ते वायरल करण्याची धमकी देत पिडीतेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. पिडितेला वारंवार फोन आणि मेसेजेस करून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात निलेश विरोधात यापूर्वी देखील गुन्हा दाखल झालेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here